Ravindra Dhangekar Pratibha Dhangekar Saamtv
मुंबई/पुणे

Kasba Peth Election: बालेकिल्यात भाजपला दे धक्का! प्रतिभा धंगेकरांची भावूक प्रतिक्रिया, म्हणाल्या; 'शरद पवारांचा आशिर्वाद...

मनात कोणतीही धाकधूक नव्हती आणि महाविकास आघाडीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरला," असे त्या म्हणाल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kasba Peth Election Result: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचे निकाल सध्या हाती येत आहेत. यामध्ये भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या मोठ्या विजयानंतर रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

28 वर्षे भाजपचा बालकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघात कॉंग्रेसने गुलाल उधळला. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) पुरस्कृत रविंद्र धंगेकर यांना एकूण 73 हजार 194 इतकी मते मिळाली असून त्यांनी 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर "राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला आशिर्वाद खरा झाला," अशा शब्दात प्रतिभा धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"रविंद्र धंगेकर यांचा अभिमान वाटत असून बहुमतांनी आमचा विजय झाला आहे. शरद पवार यांनी यशस्वी होण्याचा दिलेला आशिर्वाद खरा झाला आहे. मागील पराभवानंतर त्यांनी मी नक्की निवडून येईल असं सांगितलं होतं. मनात कोणतीही धाकधूक नव्हती आणि महाविकास आघाडीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरला," असे त्या म्हणाल्या. (Latest News Update)

तसेच याबद्दल पुढे बोलताना "भाजपने प्रचंड ताकद लावलेली होती आणि प्रतिष्ठेची लढत होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या विजयाचे श्रेय महाविकास आघाडी आणि कसब्यातील जनतेला देणार आहे. भाजपचा गड कधी नव्हताच त्यांनी हा फुगवलेला फुगा होता तो आता फुटला आहे," अशी टीकाही प्रतिभा धंगेकर यांनी केली आहे. (Ksba Peth)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा १२ राशींचे राशीभविष्य

EXIT POLL मध्ये महायुतीची सरशी; अंदाज जाहीर होताच रंगली राज ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या भविष्यवाणीची चर्चा

Friday Horoscope : मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

आयोगानं वापरलं शाईऐवजी मार्कर; मतदानाची शाई एका मिनिटात गायब

Municipal Election: केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केलं; मतदाराला बॅलेटवर मतदानाची संधी, कुठे घडला प्रकार?

SCROLL FOR NEXT