Kasba Bypoll Election Saam tv
मुंबई/पुणे

Kasba Bypoll Election : रवींद्र धंगेकर यांचं 5 तासानंतर उपोषण मागे; कसबा मतदारसंघात नेमकं काय घडलं?

पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पाच तासांनी उपोषण मागे घेतलं

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैशांचं वाटप केलं जात आहे, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीने पैशांचं वाटप केल्याच्या आरोपानंतर धंगेकर थेट उपोषणाला बसले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पाच तासांनी उपोषण मागे घेतलं आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. धंगेकर म्हणाले, 'विधानसभेत दहशतीचं वातावरण आहे. रात्री ८ पर्यंत मुख्यमंत्री कसब्यात फिरले. माझ्या कार्यकर्त्यांना नोटीसा दिल्या. कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनला डांबून ठेवलं. पैशांच्या पाऊस पडतोय. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतो. डिसीपी गिल यांनी आश्वासन दिलं आमच्या ज्या कार्यकर्त्याना त्रास दिलाय त्या पोलिसांवर (Police) कारवाई करणार आहे'.

रवींद्र धंगेकरांनी काय आरोप केले होते?

काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले होते. तसेच कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसले होते. त्यामुळे कसबा गणपती मंदिराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मंदिरासमोर उपस्थित कार्यकर्त्यांच्या हातात असलेले पोस्टर्स आणि बॅनर पोलिसांनी काढून घेतले होते. तब्बल पाच तासानंतर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी उपोषण मागे घेतले.

राऊतांनी केले होते धंगेकरांच्या आरोपांचं समर्थन

दरम्यान, पोटनिवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैशांच वाटप असा फॉम्यूला तयार करण्यात आला आहे, असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटलं आहे. मागच्या निवडणुकीत देखील हा प्रकार उघडकीस आला होता. सुरक्षितपणे पैशांचं वाटप कोण करू शकतं? तर पोलिसांची वाहने,असं राऊत यांनी म्हटलं होतं.

'असा प्रकार पाच वर्षांपूर्वी देखील उघडकीस आला होता. ज्यांनी आरोप केला असेल, तर त्यांच्याकडे पक्की माहिती आहे. भाजपच्या कालखंडात पैसे वाटपाची उदाहरणे समोर आली आहेत. पोलीस पॉलिटिकल एजंट बनून पैसे वाटतात. हे पुराव्यासह उघड झालं आहे. रवींद्र धंगेकर आरोप करताहेत म्हणजे त्यांना पक्की माहिती असणार, असं देखील संजय राऊत म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

Raj Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांच्या जागी मी असतो तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले,VIDEO

Ranveer Singh: रणवीर सिंह निभावतोय डॅडी ड्युटीज; आनंद व्यक्त करताना अभिनेत्याला शब्द सुचेना

Maharashtra News Live Updates: येवला तालुक्यातील पाटोदामध्ये भुजबळ-जरांगे पाटील समोरासमोर येणं टळलं

SCROLL FOR NEXT