कासारसाई धरणावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी Saam Tv
मुंबई/पुणे

कासारसाई धरणावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

कासारसाई धरणावर रविवारी मास्क न घालणाऱ्या तरुण पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : कासारसाई Kasarasai धरणावर dam रविवारी मास्क Mask न घालणाऱ्या तरुण पर्यटकांनी tourists मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यामुळे सोशल डिस्टसिंगचा Social distance चांगलाच फज्जा उडाला आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे कासारसाई धरणावर फिरण्याकरिता बंदी असल्यामुळे पुणे- मुंबई Mumbai, पिंपरी- चिंचवड, हिंजवडी Hinjewadi या ठिकाणी तरुण पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी आले होते.

हे देखील पहा-

कोरोनाचा Corona प्रसार कमी करण्यासाठी मास्क वापरणे आणि गर्दी न करता योग्य अंतर ठेवणे, हे बंधनकारक आहे. या नियमाचा कोणी वापर करताना दिसून आले नाही. कासारसाई धरणावर फिरण्यासाठी आलेल्या काही तरुणांकडे मास्क नव्हते. मास्क न वापरणाऱ्या तरुणांची संख्या त्याठिकाणी जास्त होती. सोशल डिस्टन्सिंग न ठेवता, धरणाच्या बॅक वॉटरला तरुणांनी चांगलीच मोठी गर्दी केली आहे.

सेल्फी काढण्याकरिता तरुणांनी भिंतीवर धोकादायक ठिकाणी जाऊ नये. याकरिता पाटबंधारे विभागाने भिंतीवर असलेले सर्व मार्ग बंद करण्यात आले आहे. याठिकाणी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहे. भिंतीवर जाण्याचे मार्ग बंद असल्याने, सध्या अनेक तरुण धरणाच्या बॅक वॉटर परिसरात धोकादायक ठिकाणी जात आहेत. यातून घडण्याची शक्यता असल्यामुळे, सुट्टीच्या दिवशी याठिकाणी पोलिस असण्याची गरज आहे.

विकेंडला पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने, कामशेत पवनानगर रस्त्यासह पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागले होते. मावळ मधील पर्यटनस्थळावर फिरण्यास बंदी असताना, देखील मोठ्या प्रमाणावर शहरामधील पर्यटकांनी ग्रामीण भागात जात आहेत. परिणामी कामशेत पवनानगर रस्तावर वाहतूक हळुवार गतीने सुरू राहत आहे. यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी झालेली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT