CM Eknath Shinde In Pune By Election Rally Saamtv
मुंबई/पुणे

Eknath Shinde: 'शहांना विजयी भेट देणे ही आपली जबाबदारी...' CM शिंदेंचे पुणेकरांना आवाहन; उद्धव ठाकरेंवर केला जोरदार हल्लाबोल

या सांगता सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kasaba Peth By Election: पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कसब्याचा पूर्व भाग ढवळून निघणार आहे. भाजपा-शिंदे गट युतीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पूर्व भागातील दुचाकी फेरीला समता भूमी येथून प्रारंभ झाला आहे. यावेळी कसब्यातील लाल महाल येथे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची समारोपाची सभाही झाली.

या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली. तसेच "अमित शहांना विजयाची भेट देणे ही आपली जबाबदारी आहे," अशी सादही त्यांनी पुणेकरांना घातली.. (Pune)

पुणे पोट निवडणूकीच्या मतदान आता अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समारोप सभा पार पडली. यासभेत त्यांनी महाविकास आघाडी तसेच उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे...

"या निवडणुकीत माघार तर जाऊ द्या पण खालच्या पातळीवरचा प्रचार महाविकास आघाडीने सुरू केला. त्यावर २६ तारखेला मतदार उत्तर देतील, अशा शब्दात हल्लाबोल केला. तसेच आमचे जुने नेते फेसबूकवरुनच बोलले, आम्हाला वाटलं आता तरी सुधारले असतील असे म्हणत त्यांना सांगितल इथे धंगेकर नाही रासने येणार म्हणून प्रवास खर्च वाचवला असेल," अशी खरमरीत टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackeray) केली..

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी "मोदींना हरवणारा अजून पैदा व्हायचा आहे असे म्हणत, कसब्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना विधानसभेत पाठवा. आम्ही बोलतो ते करुन दाखवतो, म्हणूनच औरंगाबादचे संभाजीनगर केले," अशी प्रतिक्रिया दिली.

तसेच "माझ्याकडून चुकून लोकसेवा आयोग बोलताना निवडणूक आयोग झालं,पण लोकसेवा आयोग असो व निवडणूक आयोग रिझल्टला महत्व आहे,एकनाथ शिंदे रिझल्ट दाखवतो,मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी रिझल्ट दाखवला आहे," अशी कोपरखळीही त्यांनी विरोधकांना लगावली.

दरम्यान या रॅलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप-शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT