Karuna munde Saam tv
मुंबई/पुणे

Karuna munde : मीच पहिली बायको, लग्नाचे फोटो आणि पुरावे सोशल मिडियावर टाकणार; करुणा यांचं धनंजय मुंडेंना आव्हान

Karuna munde News : करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना मोठं आव्हान दिलं आहे. मीच पहिली बायको, लग्नाचे फोटो आणि पुरावे सोशल मिडियावर टाकणार असल्याचं आव्हान करुणा यांनी दिलं.

Vishal Gangurde

मुंबई : करुणा मुंडे यांच्या पोटगी प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. माझगाव कोर्टाने मुंडे यांची याचिका फेटाळली आहे. माझगाव कोर्टाने याचिका फेटाळल्याने करुणा मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांची दोन लाखांची पोटगी कायम राहणार आहे. माझगाव कोर्टाच्या निर्णयावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आव्हान दिलं. मीच त्यांची पहिली बायको आहे. माझ्याजवळ लग्नाचे फोटो आणि पुरावे सोशल मीडियावर आहे, असं म्हणत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिलं आहे

माझगाव कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करताना करुणा मुंडे म्हणाल्या, 'मी न्यायाधीशांचे आभार मानते. मला न्याय मिळाला. आज सत्याचा विजय झालाय. मी धनंजय मुंडे यांना आठव्यांदा तोंडावर पाडलंय. महिलांसाठी ही एक आदर्श केस देशासाठी ठरली आहे. राज्याची सिस्टीम ढासळली आहे. मी खरी होती म्हणून मंत्र्याला हरवू शकले. मीच पहिली बायको असल्याचे सिद्ध झालं आहे. त्यासाठी पोटगी मिळाली आहे. लग्नाचे फोटो आणि पुरावे मिडियावर टाकणार आहे'.

'करुणाला प्रेमजाळ्यात फसवून लग्न केल्यास त्याला २० लाख देण्याचे षडयंत्र सुरू आहे. धनंजय मुंडेंची गँग हे षडयंत्र रचत आहे. धनंजय मुंडेंचे डोके एवढं नाही. बीडचा आका आत गेलाय, पण पुण्याचा आका आता हे काम करतोय. मुंडे यांच्या विरोधात बोलल्यास माझ्या मुलीला उचलून नेण्याची धमकी दिली जात आहे. शिवानीला उचलून नेण्याची धमकी दिले जाते. मी तक्रारही केली आहे. पाच सहा दिवस झाले तक्रार करून. मुंडे आणि परळीचे लोक असून ज्यांनी व्हॉटसअपवर धमकी दिली आहे. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल, तेव्हा माझा मोठा विजय असेल, असे करुणा यांनी सांगितलं.

'राज घनवट,तेजस ठक्कर यांनी काही लोकांना मला फसवून लग्न करण्यासाठी २० कोटी ऑफर दिली. मला त्रास देत राहाल तर मी आत्महत्या करेन, असे त्यांचे प्रयत्न आहेत. पुण्याचा आका वेगळा आहे. राज घनवट २५०० कोटींचा मालक आहे. तो कुठल्या महिलांवर खर्च करतो. बायकोसाठी खर्च करत नाही. पण तो पैसा कुठं जातो ते मी सांगणार, असे करुणा मुंडे पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT