Chhatrapati Sambhajinagar  Saam Tv
मुंबई/पुणे

CCTV Footage : टोलनाक्यावर कर्मचाऱ्याला महिलेनं पळवून पळवून मारलं, पाहा VIDEO

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Satish Kengar

रामू ढाकणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर महिलेने एका नाक्यावरील कर्मचाऱ्याला पळवून पळवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी टोल नाक्यावर घडली आहे. या महिलेने टोल नका कर्मचारीला चप्पल, दगड आणि बॅरियरचा तुकडा हातात घेऊन मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

योगेश विजय साठे, असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो करोडी टोल नाक्यावर टोल कलेक्टर म्हणून काम करतो. तर ही मारहाण करणारी महिला देखील याच टोल नाक्यावर काम करते.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने या तरुणाला 'मला बसायला खुर्ची दे', असं म्हटलं. यानंतर 'तू फक्त इथे मुली बघायला येतो का', असं म्हणत मारहाण केली. टोल नाक्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. दरम्यान, या प्रकरणी मारहाण करणाऱ्या महिलेविरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिपावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, ही महिला टोल नाका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लागवते. यानंतर तोही आक्रमक होतो. मात्र टोल नाक्यावर उभे असलेले काही लोक त्याला महिलेपासून दूर घेऊन जातात.

हा टोलनाका कर्मचारी काही अंतरावरच गेलेला असताना ही महिला परत त्याकडे धावून येते आणि त्याला चप्पलेने मारहाण करते. यानंतर पुन्हा काही लोक या कर्मचाऱ्याला तिच्यापासून दूर घेऊन जातात. मात्र ही महिला कोणाचंही ऐकत नाही आणि पुन्हा त्या टोलनाका कर्मचाऱ्याच्या जवळ जाते आणि यावेळी त्याला ती बॅरियरचा तुकडा हातात घेऊन मारहाण करते, असं या व्हिडिओत दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT