Rain in Karjat Badlapur saam tv
मुंबई/पुणे

karjat Flood : पावसाचा हाहाकार, उल्हास नदीला पूर; राज्यमार्ग पाण्याखाली; आंबिवलीजवळ बंधारा फुटला, VIDEO

Rain in Karjat Badlapur : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात सर्वदूर पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातही पावसानं थैमान घातलंय. उल्हास नदीला पूर आला आहे. तर आंबिवलीजवळचा बंधारा फुटल्यानं नजीकच्या गावात पाणी शिरलंय.

Nandkumar Joshi

मयुरेश कडव, बदलापूर, साम टीव्ही

जून महिन्यात रखडलेला पाऊस जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धुमाकूळ घालत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस मुंबईसह पालघर, रायगड आणि आसपासच्या जिल्ह्यांत अविश्रांत कोसळतोय. काल रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला असून, रायगडच्या कर्जत तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.मुसळधार पावसामुळं उल्हास नदीला पूर आला आहे. नेरळजवळील रस्ता पाण्याखाली गेला आहे.

दामदहून नेरळकडे जाणारा आणि उल्हास नदीला लागून असलेला रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दामद गावाहून नेरळचा साईमंदिराकडे जाणारा रस्ता आणि त्या मार्गे दहिवली, कोदिवले, बिरदोले, अवसरे, वरई ते पोशीर आणि कळंब, वारेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. उल्हास नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. चालकांनी वाहत्या पाण्यातून वाहने घेऊन जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कर्जत-बदलापूर राज्यमार्गावर कासगावजवळ पाणीच पाणी

मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी बदलापूर आणि वांगणी दरम्यान असलेल्या राज्यमार्गावर आले आहे. त्यामुळे राज्य मार्गावरची वाहतूक ठप्प झालीय. हा कल्याण- कर्जत राज्यमार्ग असून दररोज शेकडो वाहने ये-जा करत असतात. उल्हास नदी ओसंडून वाहत असल्याने कासगावजवळ हा राज्यमार्ग पाण्याखाली गेला आहे. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती.

आंबिवलीजवळ बंधारा फुटला

रायगडच्या कर्जत तालुक्यातील आंबिवली गावाजवळ ३० ते ३५ वर्षे जुना बंधारा फुटला. सकाळी बंधारा फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून एका बंगला प्रकल्पातील घर पाण्याखाली गेले आहे. मोगराज, रजपे आणि जांबरुंग परिसरातील अनेक गावांचा रस्तेमार्गाने संपर्क तुटला आहे.

कर्जतमधील ४ पूल पाण्याखाली

सचिन कदम, रायगड

कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला असून मोहिली, दहिवली-मालेगाव, शेलू आणि पाषाण येथील चार पूल पाण्याखाली गेले. या मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे जवळपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. पोलिसांनी पुलांवर सुरक्षा कठडे उभारले असून, नागरिकांना ये-जा करण्यास मनाई केली आहे. शेलू भागात काही चाळींमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. चिल्हार, पेज नद्यांनाही पूर आल्याने परिस्थिती धोकादायक होत चालली आहे. नेरळ-कळंब मार्गावरील वाहतूक रात्रीपासून बंद आहे.नेरळ ते पाषाण परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माओवादी असल्याचा बनाव करणाऱ्या सहा जणांना अटक; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Earthquake: नाशिक- पालघर पुन्हा हादरलं! सुरगाणा,दिंडोरी, कळवण भागातील जमीन थरथरली, वारंवार का येतोय भूकंप?

Palghar Waterfall : पालघरपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' मनमोहक धबधबा, वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट!

Famous Actor Death: बॉलिवूडवर शोककळा! देव आनंद यांचे सुपुत्र अभिनेते सुनील आनंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ITR Filing : शेवटचे 2 दिवस उरले! फॉर्म 16 मिळाला नाही? तरीही ITR भरता येतो का? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT