Kalyan Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: कोयत्याचा धाक दाखवत पानटपरी चालकाला मारहाण करून लुटले, घटना CCTV त कैद

Kalyan News: कोयत्याचा धाक दाखवत पानटपरी चालकाला मारहाण करून लुटले, घटना CCTV त कैद

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News:

कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे हातात कोयता घेऊन तरुणांच्या टोळीने एका पानटपरीवर सामानाची नासधूस केल्याची घटना घडली आहे. या टोळीने टपरी चालकासह त्याच्या वडिलांना लाथा बुक्क्यांनी मारहाणही केली. ही घटना कल्याण पूर्व येथील चिंचपाडा म्हात्रे नाका परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली आहे.

हातात कोयता घेतलेल्या तरुणांचे दहशत सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीये. याप्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले पोलीस पुढील तपास करत आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, कल्याण पूर्व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाली आहे. वाढते गुन्हेगारी रोखण्याचा आव्हान पोलिसांसमोर उभा ठाकलाय. (Latest Marathi News)

पवन चाैरसिया हा टपरीचालक चिंचपाडा परिसरात राहतो. त्याची पानटपरी चिंचपाडा म्हात्रे नाका साकेत कॉलेजजवळ आहे. काल रात्रीच्या सुमारास त्याच्या टपरीवर काही जण आले. हातात कोयता घेऊन दुकान बंद कर असे धमकाविले. त्याच्या अंगावर कोयता उगारुन जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यांनी त्याच्या दुकानातील सामानाची नासधूस करत पैसे लुटले. त्याने प्रतिकार केला असता त्याच्यासह त्याच्या वडिलांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी गुड्डा, बाबू गायकवाड आणि अन्य दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT