Kalyan : गावठी दारू निर्मितीची हातभट्टी, गुन्हे शाखेने केली उध्वस्त! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Kalyan : गावठी दारू निर्मितीची हातभट्टी गुन्हे शाखेने केली उध्वस्त!

कल्याण जवळील असलेल्या मलंगगड भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती केली जाते. त्यामुळे आता या दारूवर कारवाईसाठी गुन्हे शाखेने पुढाकार घेतला आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : गावठी दारूची मागणी हि पुन्हा एकदा शहरी आणि ग्रामीण भागात वाढू लागली आहे. कल्याण जवळील असलेल्या मलंगगड भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती केली जाते. त्यामुळे आता या दारूवर कारवाईसाठी गुन्हे शाखेने पुढाकार घेतला आहे. मलंगगडच्या मांगरूळ गावात नव सागर मिश्रित रसायन आणि साहित्य गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

हे देखील पहा :

गावठी दारूची मागणी पुन्हा एकदा वाढली आहे. त्यामुळे दारूचा पुरवठा झाल्यास गुन्हेगारी अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे ग्रामीण भागासह शहरी भागात देखील हाणामारी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे आता  गुन्हे शाखेने पुढाकार घेतला असून सध्या दारूचा पुरवठा करणाऱ्या भट्ट्यांच्या मुळाशी घाव घालण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे कल्याण जवळील मांगरूळ गावाच्या शिवारातील १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल गुन्हे शाखेला मिळून आलं आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात कैलास जयराम पाटील आणि श्रीपत जाधव यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दारू निर्मितीसाठी लागणारे सतेले आणि एक चाकू, रबरी नळी देखील मिळाली आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वस्त मिळणाऱ्या हात भट्ट्यांकडे गुन्हे शाखेने आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daycare Safety : पालकांसाठी अलर्ट! डे केअरमध्ये मुलांना ठेवण्यापूर्वी तपासा ‘या’ महत्वाच्या सुविधा

देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, तुमच्यावर कुणाचा दबाव? उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका

Shravan Somvar: परळी वैजनाथ मंदिरात श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी; आकर्षक सजावट आणि विशेष पूजांनी परिसर भक्तिमय वातावरणात तल्लीन|VIDEO

Maharashtra Live News Update: जेजुरीत पाच मजली इमारत झुकली

प्रतिकात्मक बार तयार करून पैसे उधळत ठाकरे गटाचे महायुती सरकारच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन|VIDEO

SCROLL FOR NEXT