Kalyan Taloja Metro Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Taloja Metro: कल्याण-तळोजा फक्त ४५ मिनिटांत, मेट्रोमुळे प्रवास होणार सुकर, कोण कोणती स्थानकं होणार?

Orange metro line 12: ऑरेंज मेट्रो लाइन १२ पूर्ण झाल्यानंतर कल्याण-डोबिंवली ते नवी मुंबई प्रवास कमी वेळात आणि कमी खर्चात होईल. या मेट्रो प्रकल्पाचा फायदा ग्रामीण भागाला देखील होणार आहे.

Saam Tv

Kalyan Taloja Metro: मुंबईसह उपनगर परिसरामध्ये वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रोचा पर्याय सुचवण्यात आला. मागील काही वर्षात मेट्रो सेवा सुरु झाली, आता हळूहळू मेट्रोचे जाळे पसरत आहे. विविध मार्गिकेवरील मेट्रोच्या बांधकामाला वेग आला आहे. ऑरेंज मेट्रो लाइनच्या कामाला सुरुवात झाली आहे. या लाइनमुळे कल्याण आणि तळोजा ही दोन शहरे जोडली जाणार आहेत. मेट्रो मार्गामुळे कल्याण-डोबिंवली ते नवी मुंबई हा प्रवास ४५ मिनिटांत करता येणार आहे.

ऑरेंज मेट्रो लाइन १२ मुळे कल्याण-डोबिंवली महानगरपालिका क्षेत्र, कल्याणमधील ग्रामीण भाग हा नवी मुंबई, तळोजा भागांना जोडला जाईल. हा मेट्रो मार्ग उभारल्यानंतर कल्याण, डोंबिवली, ठाणे ही शहरे नवीमुंबईसह पनवेल या शहरांना जोडली जातील. ऑरेंज मेट्रो लाइन १२ च्या मार्गिकेवर दोन इंटरचेंज असतील. पहिली लाइन मुंबई मेट्रो लाइन ५ वरच्या कल्याण एपीएमसी, तर दुसरी लाइन नवी मुंबई मेट्रो लाइन १ वरच्या अमनदूत (तळोजा) येथे जोडली जाईल.

एमएमआरडीए म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मंडळाने कल्याण-तळोजा मेट्रो लाइनचे काम सुरु केले आहे. त्यांनी बांधकामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास एमएमआरडीएला आहे. या मेट्रो लाइनचे नेटवर्क २३,७५६ किमी इतके असणार आहे. ही लाइन पूर्ण झाल्याने मुंबई-ठाणे-भिवंडी-कल्याण-डोबिंवली-नवी मुंबई असे वर्तुळाकृती मेट्रो नेटवर्क तयार होईल.

कल्याण-डोबिंवली ते नवी मुंबई हा प्रवास कमी वेळेत सुलभतेने करता यावा यासाठी ऑरेंज मेट्रो लाइन १२ उभारली जात आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेसह पैसेही वाचणार आहेत. कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गावर कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोबिंवली एमआयडीली, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली (खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या स्थानकांचा समावेश असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडवली स्थानकाजवळ निलजे गावात डेपो तयार केला जाणार आहे. या डेपोमध्ये दुरुस्तीचे काम, चाचणी-परीक्षा करणे, अवजड उपकरणे बदलणे ही कामे होतील. डेपोचे ३०.१२ हेक्टर क्षेत्र असून त्यात गाड्यांच्या रेकसाठी १२ स्टॅबलिंग लाइन्स, ३ टेस्टिंग लाइन्स आणि ४ वर्कशॉप लाइन्स असणार आहेत. एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी ५७ हेक्टर जागा संपादित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

SCROLL FOR NEXT