Kalyan Skywalk News Saam
मुंबई/पुणे

कल्याणचा स्कायवॉक नेमका कुणासाठी? फेरीवाले, गर्दुल्ले अन् वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा वावर; नागरिक संतापले

Kalyan Skywalk News: कल्याण स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अड्डा. नागरिक हैराण. महापालिका अन् पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप.

Bhagyashree Kamble

  • कल्याणच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अड्डा.

  • दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय महिलांचा वावर.

  • नागरीक त्रस्त.

संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही

कल्याण स्थानक परिसरातील प्रसिद्ध स्कायवॉक प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पूर्व - पश्चिमला जोडणाऱ्या या पुलामुळे नागरिक आता त्रस्त झाले आहेत. स्कायवॉकवर फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथी आणि गर्दुल्ल्यांनी अड्डा मांडला आहे. यामुळे नागरिकांना रहदारी करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य म्हणजे या पुलावर वेश्याव्यवसाय करणारे महिला देखील असतात. यामुळे काही महिला नागरिकांना असुरक्षितता वाटते.

या स्कायवॉकवरून हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, अस्वच्छता, बेकायदेशीर व्यवसाय आणि असुरक्षित वातावरणामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. या संपूर्ण प्रकाराकडे महापालिका प्रशासनासह पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पालिका आणि पोलिस प्रशासनाच्या साटंलोट्यामुळे स्कायवॉक गोरखधंद्यांचा अड्डा बनला असल्याचा आरोपही कल्याणकरांनी केला आहे. प्रवाशी नागरिकांनी याचा विरोध केल्यानंतर त्यांना फेरीवाल्याच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहे. त्यामुळे प्रवाशी घाबरून यावर काही भाष्य करण्यास तयार होत नाहीत.

मुख्य म्हणजे दिवसाढवळ्याही वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलाही या स्कायवॉकवर दिसून येतात. यामुळे पुरूषांसह महिलांनाही असुरक्षित वाटते. प्रवाशांना पुलावरून जाताना नाहक त्रास सहन करावा लागतो. याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता या समस्येतून नागरिकांची सुटका कधी होणार? हा मोठा प्रश्न कल्याणकरांसमोर उभा राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - - तुमसर नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रितेमुळे दुर्गा देवीचा पेंडालात घाण पाण्याच्या विळखा

Swami Chaitanyananda Saraswati : आय लव्ह यू, बेबी.... आश्रमातल्या बाबाचे एकापेक्षा एक कारनामे, Whatsapp चॅट उघड

Subodh Bhave: सुबोध भावे झळकणार नव्या बायोपिकमध्ये; निम करोली बाबांची साकारणार भूमिका, पोस्टर प्रदर्शित

Satara : वरवी पिठाची भाकरी खाल्ल्याने ७० जणांना विषबाधा; पीठ विक्रेत्यांचे दुकाने सील

२ गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला; NCP आमदाराच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT