अभिजीत देशमुख, कल्याण
वेड्या बहिणीची वेडी ही माया..या उक्तीप्रमाणे कल्याणमधील एका बहिणीने स्वतःचे काळीज भावाला देऊन भावाचा जीव वाचवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस खात्यात कार्यरत असणाऱ्या भावाचं लिव्हर अर्थात काळीज खराब झालं. भाऊ मरण यातना सहन करत होता. डॉक्टरांनी भावाच्या नातेवाईकांना लिव्हर ट्रान्सप्लांटची सल्ला दिला होता. मात्र लिव्हर कुठे मिळत नव्हते. भावाचा जीव वाचविण्यासाठी बहीण माधुरी काळे हिने क्षणार्धात यकृताचा भाग देण्याची तयारी दाखविली. भावाला यकृताचा ६५ टक्के भाग देत जीवदान दिले. मुलुंडच्या खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. बहीण भावाच्या मदतीला धावून आली. स्वतःच काळीज भावाला देत जीवदान दिल्याने बहिणीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (Latest Marathi News)
अभिजीत भाबल आणि माधुरी काळे ही दोन सख्खी भावंडे. माधुरी शिक्षिका आणि कल्याण डोंबिवली महापालिकेची नगरसेविका आहेत. तर अभिजीत महाराष्ट्र पोलीसचा खेळाडू आहे.
काही दिवसांपूर्वी अभिजीतचे लिव्हर खराब झाल्याने ते बदलण्याची गरज असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्याचा जीव वाचविण्यासाठी आपण यकृत देण्यास तयार असल्याचे माधुरी हिने स्वताहून सांगितले. यानंतर आवश्यक चाचण्या करून ती डोनर होऊ शकते.
यावर डॉक्टरांनी शिक्कामोर्तब करताच माधुरीने न डगमगता वैद्यकीय परीक्षणासह शस्त्रक्रिये पर्यंतच्या सर्व कठीण परीक्षांना हसत हसत सामोरे जात माधुरीने आपल्या यकृताचा ६५ टक्के भाग देत भाऊ बहीण हे नाते एकमेकांच्या काळजाचा तुकडा असल्याचे दाखवून दिले. २ डिसेबर रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉक्टरांनी दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
माधुरी काळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक आहेत. त्याचप्रमाणे ते कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात शिक्षिका देखील आहेत .सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक नात्यांना तितक्याच खंबीरपणे सांभाळणाऱ्या माधुरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.