एकाच नंबरच्या दोन रिक्षा कल्याणमध्ये धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
RTO पथकाने तपासात बनावट नंबर प्लेटचा पर्दाफाश केला आहे.
शहरात वाहन गैरव्यवहारावर कठोर कारवाईची मागणी वाढलीय.
संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही प्रतिनिधी
कल्याण RTOच्या पथकाने केलेल्या तपासात एकाच नोंदणी क्रमांकाच्या दोन रिक्षा शहरात धावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट नंबर प्लेटचा वापर करून दिशाभूल करणाऱ्या या गैरप्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर घटना अशी की, कल्याण आरटीओ पथकान कडून अलीकडेच केलेल्या कारवाईत एका रिक्षाला दंड ठोठावला होता. मात्र दंडाचा मेसेज हा त्या क्रमांकाच्या मूळ व वैध रिक्षाधारक चालकाच्या मोबाईलवर पोहोचला. मी तर सदर ठिकाणी गेलोच नव्हतो, मग दंड कसा?असा प्रश्न संबंधित चालकाने उपस्थित केला. यानंतर हा प्रकार संशयास्पद वाटल्याने खऱ्या रिक्षा मालकाने आरटीओ गाठले, त्यानंतर आरटीओ पथकाने सखोल चौकशी सुरू केली.
सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विजय नरवडे यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली. वाहन क्रमांकाची पडताळणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर एकाच नंबरची दोन रिक्षा रस्त्यावर धावत असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी एक रिक्षा ही मूळ नोंदणीकृत व कायदेशीर तर दुसरी पूर्णपणे बनावट नंबर प्लेट लावून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करत असल्याचे समोर आले.
या गंभीर गैरप्रकाराची नोंद घेत RTO अधिकाऱ्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सध्या बनावट नंबर प्लेट लावणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, रिक्षा जप्त करून पुढील तपास सुरू आहे. या गंभीर गैरप्रकाराची नोंद घेत RTO अधिकाऱ्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सध्या बनावट नंबर प्लेट लावणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, रिक्षा जप्त करून पुढील तपास सुरू आहे.
आरटीओ पथकाकडून पुढील दिवसांत शहरातील रिक्षांची विशेष मोहीम राबवून नंबरप्लेट, परवाने व अन्य दस्तऐवजांची तपासणी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. त्याच बरोबर तपासणी मोहिमेत सातत्य ठेवण्याची गरज असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.कारण अशा किती बनावट नंबरप्लेटच्या रिक्षा शहरात धावत आहे हे उघड होणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.