Kalyan Accident Saam tv
मुंबई/पुणे

कल्याणमध्ये अपघाताचा थरार; बायकोला कामावरून घरी आणताना विपरीत घडलं, दुचाकीस्वार नवऱ्याचा जागीच मृत्यू

Kalyan Accident update : कल्याणमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक

अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

प्रकाश पाटील असे मृत व्यक्तीचे नाव

पत्नी प्रिया पाटील गंभीर जखमी, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

राज्यातील अपघातांचं सत्र थांबेना झालं आहे. कल्याणमध्ये भरदुपारी भीषण अपघाताचा थरार घडला. कल्याणमध्ये शुक्रवारी दुपारी दोन भरधाव वाहनांची धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने रस्त्यावर काही क्षणासाठी एकच खळबळ उडाली. दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावरील वाहनधारकांनी हळहळ व्यक्त केली.

कल्याण पश्चिम गोविंदवाडी बायपास परिसरात शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात ४५ वर्षीय दुचाकी चालक प्रकाश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी पत्नी प्रिया पाटील गंभीर जखमी झाल्या. जखमी प्रिया पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

कसा झाला अपघात?

कल्याणमधील पत्रीपूल–दुर्गाडी–गोविंदवाडी रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक एका बाजूने सुरू होती.याचदरम्यान ट्रक आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

जखमी प्रिया पाटील यांना जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करत तातडीने उपचार सुरु केले. मयत प्रकाश पाटील हे कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील रहिवासी होते. पत्नीला कामावरून घरी घेऊन येताना हा अपघात झाल्याची माहिती मिळते.

रस्त्याच्या कामामुळे वर्दळीच्या मार्गावर निर्माण झालेल्या अडचणींमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाचा शोध घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या कल्याणमधील या अपघातामुळे रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

December Bank Holiday List : डिसेंबरमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या! RBI ने जाहीर केली यादी

Maharashtra News Live Update: धुळ्यात शेतकऱ्याचे कापूस विक्रीचे पैसे लुटल्याप्रकरणी दोघांना अटक

Shirdi Vande Bharat : रेल्वेचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातली पहिली वंदे भारत एक्स्प्रेस 'या' स्थानकावरही थांबणार, कोणाला होणार फायदा?

बंडखोर आमदारांच्या गटाला हायकोर्टाचा धक्का! प्रमुख नेत्याची निवड अवैध, विधानसभाध्यक्षांचा निर्णयही बदलला

Kitchen Tips : आले-लसूण पेस्ट लवकर खराब होतेय? जास्त दिवस टिकवण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT