Stray Dogs  Saam TV
मुंबई/पुणे

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; दोन-तीन जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

kalyan stray dog : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. दोन-तीन जणांचा चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

Vishal Gangurde

शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत

भटक्या कुत्र्यांनी घेतला तिघे जणांना चावा

भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. इंदिरानगर आणि टिटवाळा परिसरात भटक्या कुत्र्यांनी दोन ते तीन जणांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक लहान मुलांना चावा घेतल्याची माहिती नागरिकांनी दिली असून, पालकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी व सायंकाळच्या वेळेत कुत्र्यांचे कळप रस्त्यांवर फिरत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. मुलांना शाळेत पाठवताना आणि खेळायला सोडताना पालकांना मोठी चिंता वाटत असल्याचे चित्र आहे. काही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत प्रभावी उपाययोजना करण्यात केडीएमसी प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वीही तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने संताप वाढत आहे.

या प्रकरणात भटक्या कुत्र्याच्या चाव्याने जखमी झालेल्या एका मुलाच्या वडिलांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत ‘आमच्या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार?’ असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी तात्काळ निर्बंधात्मक आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे कल्याणमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, केडीएमसी प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहून नेमकी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: रेशनिंगवर निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT