wife husband clash Saam tv
मुंबई/पुणे

Husband Wife Clash : धक्कादायक! पतीच्या बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्यास दिला नकार; सॉफ्टवेअर इंजिनीअरने पत्नीला दिला तलाक

Husband Wife Clash update : बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्यास दिला नकार दिल्याने पतीने पत्नीला तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर व्यक्तीने असा प्रकार केला आहे.

Saam Tv

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण : कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पार्टीत बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र, पत्नीने नकार दिला. पुढे पतीने पहिल्या पत्नीला देण्यासाठी दुसऱ्या पत्नीला माहेरावरून १५ लाख आणण्यास सांगितले. मात्र, तिने आणले नाही. त्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या पत्नीशी वाद झाल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली. पीडित पत्नीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पती हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून कल्याणमधील एका हायप्रोफाइल सोसायटीमध्ये राहतो. या प्रकारानंतर हायप्रोफाइल परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित तरुणीचे छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारी 2024 मध्ये कल्याणमध्ये राहणाऱ्या तरुणासोबत लग्न झाले होते. सुरुवातीचे काही महिने व्यवस्थित गेल्यानंतर पती तिला सतत माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास देऊ लागला. त्याने तिला सांगितले की, पहिल्या पत्नीला घटस्फोटासाठी १५ लाख रुपये द्यायचे आहेत. ते पैसे तुझ्या माहेरातून आण. यावरच थांबून न राहता, त्याने एका पत्नीला ऑफिस पार्टीत बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. या मागणीला तिने स्पष्ट नकार दिला. रागाच्या भरात पतीने तिला मारहाण केली. त्यानंतर तीन तलाक देऊन घराबाहेर काढले.

पीडित पत्नीने कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी पतीच्या विरोधात तीन तलाक आणि मारहाणीचे गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे. पतीने तीन दिल्यानंतर पत्नीला मोठा धक्का बसला आहे, असे बोललं जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे समाजातील अशा घटनांविरोधात कठोर कारवाईची मागणी आता पुढे येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT