Kalyan Railway Station Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : सुट्ट्या पैशांवरुन वाद टोकाला; रागाच्या भरात प्रवाशाची महिला बुकिंग क्लार्कला बेदम मारहाण, कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटना

kalyan railway station News : कल्याणमध्ये रागाच्या भरात प्रवाशाने महिला बुकिंग क्लार्कला बेदम केली आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : रेल्वेच्या तिकीट काउंटरवर सुट्ट्या पैशांवरून तिकीट बुकिंग क्लार्क आणि प्रवाशांमध्ये अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळतात. बुकिंग क्लार्क सुट्टे पैसे आणल्याशिवाय तिकीट द्यायला तयार नसतो. त्यामुळे याच सुट्ट्या पैशांवरून झालेले वाद पोलीस ठाण्यापर्यंतही पोहोचले आहेत. अशाच प्रकारचा एक वाद कल्याण रेल्वे स्टेशनवरही घडल्याचे समोर आले आहे.

सुट्ट्या पैशांवरून वाद झाल्यानंतर प्रवाशाने थेट तिकीट महिला बुकिंग क्लार्कला मारहाण केल्याची घटना कल्याण रेल्वे स्टेशनवर घडली. या मारहाणीत तिकीट बुकिंग क्लार्क गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने महिला रेल्वे कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्टेशनवर आज शुक्रवारी तिकीट काढताना सुट्या पैशांवरून झालेल्या वादात महिला बुकिंग क्लार्कला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत या महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच तिला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी अन्सार शेख या तरुणाला ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या महितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकावरील तिकिट काउंटर येथील तिकीट वेंडिंग मशीनवर एक प्रवासी तिकीट काढत असताना सुट्टे पैसे नसल्याने तिकीट काउंटरवर गेला. मात्र तिकीट काउंटरवरील महिला बुकिंग क्लार्कशी त्याचा वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत महिला बुकिंग क्लार्कला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत महिला कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत मारहाण करणाऱ्या प्रवासी अन्सार शेख याला ताब्यात तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकिंग कार्यलयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर महिला बुकिंग क्लार्कना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

Eknath Shinde : राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत २६ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Ishan Kishan, IPL Mega Auction: काव्या मारणने डाव टाकला! मुंबईच्या विश्वासू खेळाडूला घेतलं संघात

SCROLL FOR NEXT