kalyan latest news Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : जेलच्या गेट बाहेरच गुंडाचा वाढदिवस; पोलिसांनी दिला 'मुळशी पॅटर्न' स्टाइल दणका

kalyan latest news : जेलच्या गेट बाहेरच गुंडाचा वाढदिवस साजरा केल्याचे समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Vishal Gangurde

कल्याणच्या आधारवाडी जेलच्या गेटवर गुंडांनी वाढदिवस साजरा केला

गुंडांनी फटाक्यांची आतिषबाजी केली

वाढदिवसाची कायपण करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमधील आधारवाडी कारागृहाच्या बाहेर गुंडांनी वाढदिवस साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करणाऱ्या गुंडांवर खडकपाडा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या प्रकरणात रोहित जगदाळे, क्षितिज भगत आणि आकाश खडसे या तिघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात बंद असलेल्या एका गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या साथीदारांनी जेलच्या गेटवर मोठ्या प्रमाणात फटाके फोडून जल्लोष केला. कारागृहासारख्या संवेदनशील परिसरात अशा प्रकारची आतिषबाजी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच उपयुक्त अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी अटक केलेल्या तिघांविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कायद्याचा धाक दाखवण्यासाठी पोलिसांनी आरोपींची जेल परिसरात धिंड काढली आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारे गुंडगिरीचा आव आणणाऱ्यांना चांगलाच इशारा मिळाला आहे. खडकपाडा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकारच्या कृत्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

कल्याणमध्ये नेमकी घटना कुठे घडली?

कल्याणच्या आधारवाडी जेलबाहेर ही घटना घडली.

जेलबाहेर काय प्रकार घडला होता?

गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या साथीदारांनी जेल गेटबाहेर फटाके फोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT