चोरट्यांची कटावणी पडली अन् मेडिकल स्टोअर मधील चोरीचा प्रयत्न फसला प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

चोरट्यांची कटावणी पडली अन् मेडिकल स्टोअर मधील चोरीचा प्रयत्न फसला

कल्याण पश्चिमेतल्या एका मेडिकल स्टोअर मध्ये चोरी करण्यास आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून जेरबंद केले आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण पश्चिमेतल्या एका मेडिकल स्टोअर मध्ये चोरी करण्यास आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून जेरबंद केले आहे. कल्याण पश्चीमेतील बैलबाजार चौकात ठाकूर मेडिकल नावाचे मोठे स्टोअर आहे. पहाटे दोन चोरांनी या मेडिकल पाहणी केली. हे दोघेही चोरीसाठी मेडिकलच्या दिशेने रवाना झाले. (kalyan police catch four thieves who trying robbery in medical store)

हे देखील पहा -

एका चोराच्या हातात एकाच्या हाती कटावणी होती. चोरट्यांनी शटर कापायला सुरुवात केली आणि त्याच वेळी हातातील कटावणी जमीनीवर पडली. कटावणी पडल्याचा जोरदार आवाज झाला आणि आवाज एकून बाजूच्या सोसायटीतील काही नागरीकांनी दुकानाच्या दिशेने आले. नागरीकांनी ही बाब त्वरीत कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी वेळ न घालविता पोलिस कर्मचारी विजय भालेराव व अन्य काही पोलिस त्या ठिकाणी पोहचले आणि पोलिसांनी त्या दोन चोरट्यांना पकडले. आनंद सिंग आणि यासीर खान अशी या दोन चोरट्यांची नावे असून हे दोघेही वसईचे राहणारे आहेत. या चोरट्यांनी अजून किती दुकाने फोडली आहेत आणि अन्य चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास पोलिस करीत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT