kalyan police arrested three youth on kalyan railway police station.
kalyan police arrested three youth on kalyan railway police station. saam tv
मुंबई/पुणे

Crime News: बनावट नाेटांसह १९ वर्षाची तीन मुले पाेलीसांच्या जाळ्यात

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन (kalyan railway satation) परिसरात भारतीय चलनाच्या बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या तीन युवकांना (youth) कल्याणच्या (kalyan) महात्मा फुले पोलिसांनी (police) सापळा रचत बेड्या ठोकल्या (arrest) आहेत. रजनिशकुमार चौधरी, हर्षद खान, अर्जुन कुशवाह अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांकडून ३९ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा बनवण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. (kalyan latest marathi news)

या प्रकरणात रजनिशकुमार हा मुख्य संशयित आरोपी असून तो एडिटिंग प्रिंटिंगमध्ये निष्णात आहे. हर्षद व अर्जुनच्या मदतीने ताे नोटा बनवत असे. त्या चलनात वटवत होता. तीन महिन्यांपासून त्यांनी हे काम सुरू केले होते. या कालावधीत त्यांनी किती नोटा बनवल्या, चलनात आणल्या त्यांचा आणखी कुणी साथीदार आहे का ? याचा तपास पोलीसांनी सुरु केला आहे.

ही कारवाई महात्मा फुले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनूसार करण्यात आली. या पथकातील पाेलीसांचे उमेश माने पाटील (कल्याण एसीपी) यांनी काैतुक करुन नागरिकांनी बनावट नाेटांपासून सावध रहावे असे आवाहन केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT