Kalyan News Saamtv
मुंबई/पुणे

Kalyan News: बापरे बाप! कॉलेजमध्ये आढळला साप, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ; सगळ्यांचीच पळापळ

सर्पमित्राच्या मदतीने या सापाची सुटका करण्यात आली, मात्र कॉलेज परिसरात साप आढळल्याने चांगलीच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित देशमुख...

Snake Found In College: साप म्हणलं की भल्याभल्यांची भितीने गाळण उडते. सापाला घाबरत नाही अशी व्यक्ती सापडणे जरा कठीणचं. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी साप आला की सर्वांचीच तारांबळ उडते. असाच काहीसा प्रकार कल्याणमधील एका कॉलेजमध्ये घडला आहे. कल्याणच्या सोनवणे कॉलेजमध्ये साप आढळल्याची माहिती समोर आली आहे. (Kalyan News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील सोनवणे कॉलेजमध्ये हरणटोळ जातीचा साप आढळल्याने चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. कॉलेजच्या पहिल्या माळ्यावर पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरवर एक हिरवा साप दिसला. महत्वाचे म्हणजे यावेळी कॉलेजचे कामकाज सुरू होते, ज्यामुळे एकच खळबळ उडाली . सर्वप्रथम कॉलेजच्या शिक्षकांच्या हा साप नजरेचा पडला,ज्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत सर्पमित्रांना माहिती दिली.

साप आढळल्याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी (Snake Friend) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सर्पमित्रांनी या सापाची सुटका करत निसर्गात सोडून देण्यात आले. हा हिरव्या रंगाचा हरणटोळ साप असून तो निमविषारी असल्याचे या सर्पमित्रांनी सांगितले आहे. मात्र कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मात्र या सापाने चांगलीच तारांबळ केल्याचे पाहायला मिळाली. या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT