Kalyan Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan News : रिक्षाचालकाचं संतापजनक कृत्य, विद्यार्थिनीने थेट धावत्या ऑटोतून मारली उडी; कल्याणमधील घटना

Satish Daud

अभिजित देशमुख, साम टीव्ही

कल्याणच्या कोळशेवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्लासवरून रिक्षाने घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीची रिक्षाचालकाने छेड काढली. त्यामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. तिने थेट धावत्या रिक्षातून उडी मारत घरच्या दिशेने पळ काढला. मात्र, तरीही मुजोर रिक्षाचालकाने तिचा पाठलाग करून शिवीगाळ केली. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी (Police) त्याला अटकही केली आहे. गोपाळ मुदलीयार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व येथून एका अल्पवयीन मुलीने क्लासहून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षामध्ये बसताच रिक्षा चालकाने मुलीकडे नंबर मागितला.

इतकंच नाही तर त्याने विद्यार्थिनीची छेड (Crime) देखील काढली. रिक्षाचालकाचं कृत्य पाहून विद्यार्थिनीने त्याला रिक्षा थांबवण्यास सांगितली. मात्र, तरीही आरोपीने सुसाट वेगाने रिक्षा चालवली. तेव्हा विद्यार्थिनीने थेट धावत्या रिक्षातून उडी मारली आणि घराच्या दिशेने पळ काढला.

यानंतरही रिक्षाचालकाने विद्यार्थिनीचा पाठलाग सुरूच ठेवला. त्याने तिच्या घरापर्यंत जाऊन शिवीगाळ केली. घडलेला प्रकार मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT