Kalyan Accident Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: संतापजनक! अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदूबाबाचे तरुणीसोबत अश्लील कृत्य, कल्याणमधील घटनेने खळबळ

Khadakpada Police Station: २५ वर्षीय तरुणीसोबत अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदू बाबाने तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण जवळील आंबिवली परिसरात घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

कल्याणजवळील आंबिवली परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदूबाबाने तरुणीसोबत अश्लील चाळे केले. भोंदू बाबाच्या या संतापजनक कृत्यानंतर पीडित तरूणीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

२५ वर्षीय तरुणीसोबत अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदू बाबाने तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण जवळील आंबिवली परिसरात घडला आहे. अरविंद जाधव असं या भोंदू बाबाचं नाव आहे. पीडित तरुणीने खडकपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. खडकपाडा पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

कल्याणजवळील आंबिवली परिसरात पीडित तरुणी राहते. तिला काही अडचणी असल्याने ती जवळच राहत असलेल्या ओळखीचा भोंदूबाबा अरविंद जाधव याच्याकडे आपल्या नातेवाईकासह गेली होती. या भोंदूबाबाने नातेवाईकाला बाहेर थांबण्यास सांगितले. संधी साधत या भोंदूबाबाने तरूणीशी अश्लील चाळे केले. बाबाचं हे कृत्य बघून तरुणी घाबरली आणि तिने बाहेर पळ काढला.

पीडित तरुणीने या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तिने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी भोंदूबाबा अरविंद जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिस या भोंदूबाबाचा शोध घेत असून त्याने आणखी काही महिलांसोबत असं कृत्य केलं का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या भोंदूबाबाला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी या पीडित तरुणीने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Genelia Deshmukh Photos: साडी आणि मराठमोळे दागिने, देशमुखांच्या सुनेचा 'राजेशाही' थाट! Photo पाहतच राहाल

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

SCROLL FOR NEXT