मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेन सुरू
दर तासाला 1200 भाविक प्रवास करू शकणार
2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या सात मिनिटांवर
मयुरेश कडव, साम टीव्ही
कल्याणजवळच्या मलंगगडावरील बहुप्रतिक्षित फ्युनिक्युलर रेल्वे अखेर सुरू झालीय. भाजपचे आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत फ्युनिक्युलर रेल्वेचा शुभारंभ झालाय. फ्युनिक्युलर ट्रेनमुळे भाविकांना मलंगगडावर जाण्यासाठी लागणारा 2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या 7 मिनिटांवर आलाय. या ट्रेनमुळे मलंगगडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. तसेच येथील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
कल्याणजवळचं मलंगगड हे ठाणे जिल्ह्यातील हिंदू-मुस्लिम भाविकांचं प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेल्या मलंगगडावर जाण्यासाठी भाविकांना 2 तासांची पायपीट करावी लागते. त्यामुळे अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्वित्झर्ल्डंच्या धर्तीवर याठिकाणी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर करवून घेतला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्तशृंगी वणीगड आणि मलंगगडासाठी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केल्यांनतर प्रत्यक्ष कामही सुरू झालं होतं. मात्र वणी गडावरील रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतरही मलंगगडाचा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता. मात्र बऱ्याच अडथळ्यानंतर अखेर मंलगगडावरील रेल्वेसेवाही सुरू झालीय.
मलंगगड ट्रेन मार्गिकेवर 2 ट्रेन धावणार असून एका ट्रेनला दोन प्रशस्त डब्बे आहेत. त्यातून दर तासाला सुमारे 1200 प्रवासी प्रवास करू शकतील. भाविकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही सेवा 24 x 7 तास देण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलीय. या फ्युनिक्युलर ट्रेनसाठी एकूण 70 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.