Kalyan-Latur Mahamarg Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan-Latur Mahamarg: कल्याण-बीड-लातूर.... जनकल्याण महामार्ग 6 जिल्ह्यातून जाणार, वाचा कोणकोणत्या तालुक्याला होणार फायदा

Kalyan Latur Highway Jan Kalyan Mahamarg: कल्याण-लातूर हा जनकल्याण महागामार्ग महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यातून जाणार आहे. या महामार्गामुळे अनेक तालुक्यांना फायदा होणार आहे.

Siddhi Hande

मुंबई ते लातूर प्रवास सुसाट होणार

कल्याण-लातूर जनकल्याण महामार्गाला मंजुरी

या ६ जिल्ह्यातून जाणार

मुंबई ते मराठवाडा प्रवास हा खूप सोपा होणार आहे. कल्याण-लातूर जनकल्याण महामार्गाला (Kalyan Latur Highway) मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने द्रुतगती महामार्ग बांदण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे मुंबई, लातूरसह अनेक जिल्ह्यांना फायदा होणार आहे. अनेक जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गाला राज्य सरकारनेही मंजुरी दिली आहे. यानंतर एमएसआरडीसीने संरेखनाच्या कामाला सुरुवात केली आहे.

या सहा जिल्ह्यातून जाणार महामार्ग (Kalyan Latur Jan kalyan Mahamarg join these 6 District)

कल्याण-लातूर जनकल्याण महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर,बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यातून जाणार आहे. सहा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना हा महामार्ग जोडला जाणार आहे. एमएसआरडीसीचा हा प्रस्तावित महामार्ग चार हजार किमी लांबीचा असणार आहे. या महामार्गाला मंजुरीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. त्यानंतर आत जनकल्याण महागामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

आता संपूर्ण मराठवाड्याचा विकास होणार आहे. त्यामुळे या महामार्गाला जनकल्याण असं नाव दिले आहे. या महामार्गाचे संरेखन पूर्ण होण्यास काही दिवस लागणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरु होईल.

या तालुक्यांना होणार फायदा (Kalyan Latur Highway Join These place)

कल्याण लातूर महामार्ग कल्याण (Kalyan), माळशेज घाट (Malshej Ghat), बीड (Beed), मांजरसूंबा येथून पुढे लातूरला जाणार असल्याचे समजत आहे. त्यानंतर शेवटी महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात हा महामार्ग जाणार आहे. यामुळे उल्हासनगर, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब, लातूर, सा, निलंगा येथून हा महामार्ग जाणार आहे.यामुळे ठाणे, बीड, धाराशीव अशा अनेक जिल्ह्यांना फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Haldi Kumkum Rangoli Design: हळदी- कुंकूवासाठी काढा या 5 सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या

Reduce Electricity Bill : तुम्हालाही लाईट बील प्रमाणाच्या बाहेर येतय? कमी करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

Maharashtra Live News Update : राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात कोण होणार महापौर? चार महिला नेत्यांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT