पुणे,नागपूरनंतर कल्याणमध्ये हिट अँड रन; भरधाव जीपची दुचाकीस्वार तरुणींना धडक, परिसरात खळबळ
kalyan  file photo
मुंबई/पुणे

Kalyan News : पुणे,नागपूरनंतर कल्याणमध्ये हिट अँड रन; भरधाव जीपने बाइकवरील इंजिनीअरिंगच्या २ तरुणींना उडवले

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : पुणे, नागपूरनंतर आता कल्याणमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. कल्याणमध्ये भरधाव जीपने दुचाकीस्वार तरुणींना धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातानंतर जीप चालक गाडी घेऊन पसार झाले आहेत. या घटनेने अपघातस्थळी एकच खळबळ उडाली आहे.

कल्याणमधील रिंग रोडवर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणच्या रिंग रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर गाडी घेऊन चालक पसार झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही तरुमी गंभीर जखमी झाल्या आहेत.

या अपघातात सेजल भानुशाली, समीक्षा भानुशाली या तरुणी जखमी झाल्या आहेत. दोन्ही तरुणी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनी आहेत. घरी परतत असताना हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. या जीपवर देवा गृप लिहिल्याची माहिती हाती आली आहे. या अपघात प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी जीप चालकाचा शोध सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पश्चिमेकडील रिंग रोड येथील गांधारी पूलाजवळ एका भरधाव जीप चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन तरुण विद्यार्थिनी जखमी झाल्या. सेजल भानुशाली आणि समिक्षा वानखेडे अशी या जखमी तरुणींची नावे आहेत. त्या दोघींनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दोन्ही तरुणी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. दुचाकीवरुन घरी परतताना दोघींचा अपघात झाला. खडकपाडा पोलिसांनी जीप चालकाचा शोध सुरु केला आहे. रिंग रोडचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. त्यात काही स्टंटबाज धूम स्टाईल वाहनचालकांमुळे या रिंग रोडवर अपघातांचा प्रमाण वाढले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Instagram Post: मैदानानंतर इंस्टाग्रामवरही विराटची हवा! वर्ल्डकप विनिंग पोस्टने मोडले सर्व रेकॉर्ड

Doctors Day 2024 : दरवर्षी डॉक्टर डे १ जुलै रोजी का साजरा करतात? वाचा काय आहे कारण

Today Marathi News : 'वर्धा जिल्ह्यातील 1463 शाळा आजपासून सुरू', पुष्पगुच्छ देत स्वागत

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi VIDEO: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Amravati News : अमरावती जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे ६५ टक्के पेरण्या रखडल्या; शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा

SCROLL FOR NEXT