Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याणच्या 'भगवा तलावावर' 'हिरवळीची कत्तल'! स्मार्ट सिटीत 'झाडं तोडा, स्टॉल जोडा'चा घाट

Kalyan News : कल्याणच्या ऐतिहासिक भगवा तलावावर झाडं तोडून लोखंडी फूड स्टॉल्स उभारले जात असल्याने नागरिकांचा संताप उसळला आहे. वॉकिंग आणि व्यायामासाठी असलेली जागा हिरावली जात असल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • कल्याणच्या भगवा तलावावर झाडं तोडून बेकायदेशीर फूड स्टॉल्सची उभारणी सुरू झाली आहे.

  • वॉकिंग आणि जॉगिंगसाठी नागरिकांची जागा हिरावली जाणार असल्याने तीव्र विरोध केला जातो आहे.

  • तलाव परिसरात घाणीचं साम्राज्य पसरल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • अधिकृत प्लाझाऐवजी प्रशासनाने आता लोखंडी फूड काउंटर्स उभारण्यास सुरुवात केली आहे.

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

कल्याणचा ऐतिहासिक भगवा तलाव हजारो नागरिकांच्या सकाळ-संध्याकाळच्या वॉकिंगसाठी ओळखला जाणारा हा तलाव आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण, तलाव परिसरात झाडं तोडून बेकायदेशीर फूड स्टॉल्स उभारणीचं काम सुरू आहे. यावर नागरिकांचा तीव्र संताप उसळलाय. तलाव परिसरात आधीच सोयीसुविधांचा बोजवारा असून, आता या फूड प्लाझामुळे घाणीचं साम्राज्य पसरू शकतं, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हजारो नागरिकांसाठी सकाळ-संध्याकाळ हक्काचं विरंगुळा आणि आरोग्याचं केंद्र असलेल्या ऐतिहासिक भगवा तलाव परिसरात सध्या मोठे वादळ उठले आहे. 'स्मार्ट सिटी' प्रकल्पाअंतर्गत झालेल्या शुशोभीकरणानंतर तलावाला नवा चेहरा मिळाला, पण आता याच सौंदर्याला प्रशासनाच्या एका अनाकलनीय निर्णयामुळे ग्रहण लागण्याची भीती आहे.भगवा तलावाच्या आतील भागात झाडं तोडून खाद्य स्टॉल्स उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, तलावाच्या शुशोभीकरणाच्या वेळीच अधिकृत फूड प्लाझाची उभारणी करण्यात आली होती, मात्र तो अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. या अधिकृत प्लाझाऐवजी, प्रशासनाने आता लोखंडी फूड काउंटर्स उभारण्यास सुरुवात केली आहे.​या स्टॉल्ससाठी झाडं तोडली जात आहेत आणि नागरिकांची सकाळची वॉर्म-अप करण्याची जागा देखील या कामामुळे बळकावली जात आहे​ या मुळे सकाळी आणि सायंकाळी हजारो कल्याणकर या तलावावर मॉर्निंग वॉक, जॉगिंग आणि वॉर्म-अपसाठी येतात.

सध्या सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून "आमच्या वॉक आणि वॉर्म-अप साठी कल्याणमध्ये भगवा तलावाशिवाय दुसरी मोकळी जागा नाही. जर या जागेवर स्टॉल्स उभे राहिले, तर आम्ही फिरायचं आणि व्यायाम करायचा कुठे?" असा सवाल व्यक्त करत ​फूड स्टॉल्स सुरू झाल्यास तलाव परिसरात घाणीचे साम्राज्य पसरेल. अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. खाण्याचे पदार्थ विकले गेल्यास कचरा, उष्टे आणि अस्वच्छता वाढेल, ज्यामुळे तलावाचे सौंदर्य आणि शांतता नष्ट होईल.

नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र विरोध दर्शविला आहे आणि त्यांची मागणी आहे की, सध्या सुरू असलेले लोखंडी स्टॉल उभारण्याचे काम त्वरित थांबवावे आणि अधिकृतपणे तयार केलेला फूड प्लाझा त्वरित सुरू करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देखील या नागरिकांकडून दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balasaheb Thackeray Death: बाळासाहेबांच्या मृत्यूची CBI चौकशी? मृत्यूनंतर 14 वर्षांनी का तापलं राजकारण?

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? गौतमीच्या कारमध्ये राजकीय नेता कोण?

Ramdas Kadam: रामदास कदमांची बायको जळली की जाळली? 1993 च्या प्रकरणावरुन कदमांची कोंडी?

Indian Student Death : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, अज्ञातांनी छातीत गोळ्या घालून संपवलं

Maharashtra Live News Update : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT