Kalyan Fake Doctor Sakal
मुंबई/पुणे

Kalyan Bogus Doctor : डॉक्टर असल्याचा बनाव, तरीही रुग्णांवर उपचार, दोघांवर पालिकेची कारवाई; कल्याणमध्ये खळबळ

Kalyan Fake Doctor : कल्याण डोबिंवली महानगरपालिकेच्या कल्याणजवळच्या मानेरे गावात कारवाई केली. कारवाईत पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकाला दोन बोगस डॉक्टर सापडले. या बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yash Shirke

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची बोगस डॉक्टरांवर कारवाई सुरु आहे. महापालिकेने कल्याणजवळील मानेरे गावात कारवाई केली. या कारवाईदरम्यान पालिकेच्या पथकाच्या तावडीत दोन बोगस डॉक्टर सापडले आहेत. या दोघांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय व भारतीय न्यायसंहिता अधिनियमाच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरोधात मोठी कारवाई सुरु करण्यात आली असून या कारवाईदरम्यान पालिकेच्या वैद्यकीय पथकाने मानेरे गावातील 'श्री साई क्लिनिक' येथे छापा टाकत दोन अनधिकृत डॉक्टरांचा पर्दाफाश करत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

श्रीकृष्ण कुमावत आणि देवेंद्र पुजारी असे या दोघांचे नाव असून कारवाईदरम्यान हे दोघे वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आले. मात्र त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता नव्हती. श्रीकृष्ण कुमावत यांच्याकडे कोणताही वैद्यकीय डिग्री नाही, तर देवेंद्र पुजारी यांच्याकडे इलेक्ट्रो होमिओपथी या उपचार पद्धतीची अर्हता आहे. परंतु ही पद्धत शासनमान्य नसल्याने त्यांच्या नोंदणीसाठी कोणतीही वैद्यकीय परिषद अस्तित्वात नाही.

वैद्यकीय सेवा अनधिकृत ठरत असल्याने श्रीकृष्ण कुमावत आणि देवेंद्र पुजारी यांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, 1961 चे कलम 33 व 36 भारतीय न्यायसंहिता कायदा, 2023 अंतर्गत कलम 318 व 319 कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या विठ्ठलवाडी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे प्रकरण समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT