Kalyan News x
मुंबई/पुणे

Kalyan : बनावट फोटो लावून जमिनीचा डेव्हलपमेंट करार, ११ जणांवर गुन्हा दाखल; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

Kalyan News : कल्याण पूर्वमधील तिसगावमध्ये बनावट फोटो वापरुन एका महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणामध्ये ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yash Shirke

  • कल्याणमध्ये एका वृद्ध महिलेची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • बनावट कागदपत्रे बनवून डेव्हलपमेंट करार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • या प्रकरणी महिलेच्या मुलाने केलेल्या तक्रारीनंतर ११ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याण पूर्व येथील तिसगाव परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वृद्ध महिलेच्या जमिनीवर बनावट कागदपत्रे बनवून डेव्हलपमेंट करार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये राम दिनकर म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, राम म्हात्रे यांच्या आई राजूबाई दिनकर म्हात्रे यांच्या नावावर तिसगाव येथे एक जमीन आहे. या जमिनीबाबत संदीप गायकवाड या व्यक्तीने राजूबाई म्हात्रे आणि इतर सहा जणांच्या नावाने डेव्हलपमेंट करार केला. पण हा करार करताना राजूबाई यांना न बोलावता त्यांच्या नावासमोर दुसऱ्या महिलेचा फोटो लावून आणि हाताचा ठसा घेऊन बनावट करारनामा तयार करण्यात आला.

डेव्हलपमेंट करारामध्ये राजू गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीने साक्षीदार बनून बनावट महिलेला आम्ही ओळखतो, अशी खोटी साक्ष दिली, असा आरोप राजूबाई यांचा मुलगा राम म्हात्रे यांनी केला आहे. खोटी कागदपत्रेच नव्हे, तर खोटे साक्षीदार उभे करुन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

फसवणूक प्रकरणानंतर कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ११ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, तपासाचा वेग संथ गंतीने होत असल्याचा आरोप राम म्हात्रे यांनी केला आहे. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला ताब्यात घेतले नाही किंवा प्राथमिक चौकशीही केली नाही. बनावट कागदपत्रे आणि खोट्या व्यक्तींच्या सहाय्याने जमिनी हडपल्या जात आहेत. या प्रकरणाचा तपास करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार म्हात्रे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT