kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Durgadi Fort Navratri : कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्री जल्लोषाची जय्यत तयारी सुरु

kalyan News : कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्री जल्लोषासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात. दुर्गाडी समिती आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षेपासून ते सुविधा पुरवण्याचं विशेष नियोजन करण्यात आलं आहे.

Alisha Khedekar

  • गणेशोत्सव संपताच कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्री जल्लोषाची तयारी.

  • गेल्या ५० वर्षांपासून दुर्गा माता मंदिरात परंपरेनं नवरात्र महोत्सव आयोजित.

  • लाखो भाविकांच्या गर्दीसाठी सुरक्षा, पाणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध.

  • शिवसेना पदाधिकारी व दुर्गाडी समिती यांच्या नेतृत्वाखाली नियोजनाला वेग.

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

गणेशोत्सव संपताच आता राज्यभर नवरात्रीचा उत्साहाची तयारी सुरू झाली आहे. नवरात्री उत्सवाची कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षी लाखो भाविकांचा लोंढा उसळतो. यंदाही या दुर्गा माता मंदिरात नवरात्रीच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी गेल्या ५० वर्षापासून याचे नियोजन दुर्गाडी समिती आणि शिवसेना पदाधिकारी सांभाळतात याच पार्श्वभूमी वर शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी किल्ल्यावर पाहणी करून महत्त्वाची बैठक घेतली असून, भाविकांसाठी विशेष सुविधा देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रीचा जल्लोष रंगण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष , पदाधिकारी आणि स्थानिक नेतेमंडळींनी किल्ल्याची पाहणी करून नवरात्री नियोजनाची महत्त्वाची बैठक घेतली.गेल्या पन्नास वर्षांपूर्वी किल्ल्यावरची बंदी मोडून शिवसेनेने दुर्गा माता मंदिरात नवरात्री महोत्सव सुरू केला होता.

त्यानंतर दरवर्षी मोठ्या थाटामाटात आणि भक्तीभावात हा उत्सव पार पडतो. नवरात्रीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी किल्ल्यावर हजेरी लावतात. गेल्या काही वर्षांत हा आकडा पाच लाखांपेक्षा अधिक झाला आहे. या प्रचंड गर्दीचं नियोजन, सुरक्षा, वाहतूक आणि सुविधा याची जबाबदारी दुर्गाडी समिती आणि शिवसेना पदाधिकारी सांभाळतात. यंदाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

दर्शन रांगा व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था ,पिण्याच्या पाण्याची सोय,वैद्यकीय मदत केंद्र,वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांसोबत समन्वय आज झालेल्या बैठकीत या सर्व बाबींवर चर्चा करून तयारीला वेग देण्यात आला. कल्याणकरांसाठी दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्री महोत्सव हा भक्ती, परंपरा आणि जल्लोषाचा संगम ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीड जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या साह्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू

Parbhani Rain: परभणीत पावसाचा हाहाकार, गोदावरी नदीला पूर; गावकऱ्यांचा तराफ्यावरून प्रवास| VIDEO

Navi Mumbai Airport : वाह! नवी मुंबई विमानतळाचे इनसाईड फोटो पाहून मन भरून येईल

दिवाळीपूर्वी कुंभ राशीसह 'या' तीन राशींना होणार फायदा, शनीचा नक्षत्रात होणार बदल

Jio Recherge Offer: युजर्ससाठी खास ऑफर! Jio चा व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT