Kalyan Dombivli Breaking  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli Breaking : डोंबिवलीत ६५ अनाधिकृत इमारतींनंतर आता २०० हून अधिक घरांवर टांगती तलवार; जाणून घ्या सविस्तर

Dombivli News : डोंबिवली पश्चिमेकडील २०९ घरांना रेल्वे अतिक्रमणाच्या कारणावरून नोटिसा बजावल्या आहेत. घरमालक संतप्त असून त्यांनी पुनर्वसन व न्यायाची मागणी केली आहे. ही बाब सरकारने गांभीर्याने घ्यावी, असं रहिवाशांचं म्हणणं आहे.

Alisha Khedekar

स्वतःच घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. महागाईच्या या जमान्यात हे स्वप्न बंदिस्त पेटाऱ्यात राहतं. मात्र काबाडकष्ट करून काही जण आपल्या स्वप्नांची पूर्तती करतात. अशातच तुम्हाला जर समजलं तुमचं घर अनधिकृत जागेवर राहत आहात तर? अशीच घटना डोंबिवलीतील रहिवाशांसोबत घडली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर आणि भगवान काटेनगर परिसरातील सुमारे २०९ घरांना रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचं कारण देत रेल्वेकडून संबंधित रहिवाशांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या घटनेने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवली पालिकेला डोंबिवलीतील ६५ इमारती जमीनदोस्त करण्याचा आदेश दिल्यानंतर आता डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर आणि भगवान काटेनगर परिसरातील सुमारे २०९ घरांना रेल्वे प्रशासनानं कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत रहिवाशांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत. यामुळं रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली असून, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी नोटिसा मिळाल्यानंतर रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "आम्ही आमच्या जीवनभराची पुंजी घालून घरं विकत घेतली आहेत, पालिकेत नियमित करही भरतो," असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र, त्यांची फसवणूक झाली असून, त्यांनी कोणतंही अतिक्रमण केलेलं नाही, असा दावा रहिवासी करत आहेत.

रहिवाशी म्हणाले "२०१२-१३ पासून विकासकाकडून पैसे भरून ही घरं विकत घेतली आहेत आणि त्यांच्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रं आहेत. त्यामुळे, आम्ही कोणतंही अतिक्रमण केलेलं नसून, विकासकाने आमची फसवणूक केली आहे," असा या रहिवाशांचा आरोप असून या गंभीर समस्येकडं सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

तसेच "आम्हाला बेघर करू नका, आमचं पुनर्वसन करा किंवा योग्य मोबदला द्या, अन्यथा कुटुंबांसह रस्त्यावर उतरून मोर्चा काढू" अशी मागणी करत रहिवाशांनी सरकारला इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान डोंबिवलीत एकापाठोपाठ एक येणाऱ्या अशा अनाधिकृत बांधकामांच्या प्रश्नांमुळं हजारो कुटुंबांच्या डोक्यावर बेघर होण्याचं संकट उभं राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामागे राजकारण?सरकार आणि धनखडांमध्ये कुठे पडली ठिणगी?

Goodluck Cafe: 'गुडलक' कॅफेचे पुन्हा 'बॅड लक'; आता अंडा भूर्जीमध्ये आढळलं झुरळ

Manikrao Kokate: कृषीमंत्री पुन्हा बरळले, 'शासन भिकारी' मुख्यमंत्र्यांची कोकाटेंना तंबी

SCROLL FOR NEXT