कल्याण डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग
ठाकरे गटाचे ११ नगरसेवक अज्ञातस्थळी
कल्याण-डोंबिवलीत राजकीय चर्चांना उधाण
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने फोन येत असल्याने ठाकरे गटाच्या ११ नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन झाल्यानंतर हे सर्व नगरसेवक लवकरच ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून समोर येणार आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाला महापौर बसवण्यासाठी किमान ९ नगरसेवकांची आवश्यकता असल्याने फोडाफोडीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या ११ नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. मात्र, हे सर्व ११ नगरसेवक ठाकरे गटाकडेच ठामपणे असल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिली आहे.
ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे की, निवडून आल्याच्या पहिल्याच दिवसापासून शिंदे पक्षाच्या नेत्यांकडून आमच्याकडे या अशी मागणी आणि दबाव टाकला जात होता. या पार्श्वभूमीवर कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी आणि एकजूट दाखवण्यासाठी नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या घडामोडींमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्तासमीकरणे तापली आहेत. आता पुढील काही दिवसांत मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप - 51
शिवसेना -52
राष्ट्रवादी अजित पवार - 00
काँग्रेस - 02
शिवसेना ठाकरे - 11
मनसे - 05
राष्ट्रवादी शरद पवार - 01
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.