Maharashtra Political News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News: ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली, पक्षातील नेते न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत

Maharashtra Political News: कल्याण आणि डोंबिवलीमधील ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Kalyan Dombivli News:

ठाकरे गटाकडून गेल्या काही दिवसांपासून विविध भागात 'होऊ द्या चर्चा' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. उल्हासनगरमधील कार्यक्रमात पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर कल्याण आणि डोंबिवलीमधील याच कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. (Latest Marathi News)

'होऊ द्या चर्चा' या कार्यक्रमामुळे झालेल्या तणावामुळे उल्हासनगरसह कल्याण डोंबिवलीत पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांनी ठाकरे गटातील पदाधिकारी व नेत्यांना कार्यक्रम रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

पोलिसांच्या या भूमिकेनंतर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये जाणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून 'होऊ द्या चर्चा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्या रविवारी ८ ते १५ ऑक्टोबरदरम्यान विविध ठिकाणी 'होऊ द्या चर्चा' हा कार्यक्रम होणार होता.

या कार्यक्रमाची रितसर परवानगी शहर प्रमुख सचिन बासरे यांनी पोलिसांकडे मागितली होती. त्यानंतर काही अटी शर्ती घालून पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी दिली होती.

दरम्यान, ५ ओक्टोबर रोजी उल्हासनगरात हाच कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधानाच्या विरोधात एका तरुणाने अपशब्दाचा वापर केला. त्यामुळे हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला. त्यामुळे अन्य ठिकाणी होणाऱ्या 'होऊ द्या चर्चा' या कार्यक्रमात वादंग निर्माण होऊ शकतो. तसेच यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे कारण देऊन पोलिसांनी कल्याणमधील कार्यक्रमास दिलेली परवानगी नाकारली आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर शहर प्रमुख बासरे यांनी पोलिसांनी परवानगी नाकारली हे योग्य नाही, असं म्हणत या प्रकरणात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT