uddahv thackeray and raj thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ, उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर नाराज; दोन भावांची युती तुटणार?

Uddhav thackeray News : उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही पक्षाचे नगरसेवक एक असते तर मोठी ताकद झाली असती, असे ते म्हणाले. यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Vishal Gangurde

स्थानिक पातळीवर मनसेचा वेगळा निर्णय

उद्धव ठाकरेंकडून मनसेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त

ठाकरेंकडून शिवसेनेच्या नगरसेवकांना मार्गदर्शन

कल्याण-डोंबिवली महापालिकेत स्थानिक पातळीवर मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मनसेच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमधील नगरसेवकांना धीर दिला. तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना दिला.

उद्धव ठाकरे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवर झाली. या बैठकीत ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील विविध राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी बैठकीत तुम्हाला कुठेही वाळीत टाकला जाणार नाहीत. तुम्ही भविष्याची चिंता करू नका, असा विश्वासही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला.

कल्याण-डोंबिवलीत ठाकरे यांच्या नगरसेवकांना भाजप आणि शिंदे गट या दोन्ही पक्षाकडून संपर्क साधला जात आहे. या नगरसेवकांसमोर अनेक प्रस्ताव ठेवले जात आहेत. दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर काय भूमिका घ्यावा, त्यांचं काय करावं? याबद्दल नगरसेवकांनी विचारणा केली. या नगरसेवकांच्या प्रश्नानंतर उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. 'आपण विरोधी पक्षात बसणार आहोत. मात्र यामध्ये सुद्धा तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल. यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू', असं ठाकरेंनी नगरसेवकांना सांगितलं.

'तुम्हाला कुठलाही प्रस्ताव जरी आला, तरी पक्ष पातळीवर पक्ष यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. कल्याण-डोंबिवलीत आपण विरोधी बाकावर बसणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांसमोर स्पष्ट केलंय.

महापालिकांच्या निवडणुकीत मनसेच्या स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाशी युती करण्याचा निर्णय घ्यायला नको होता. मनसे आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर एका ताकदीचा विरोधी गट कल्याण-डोंबिवली महापालिकेत बसला असता, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर दोन्ही बंधूंची युती तुटणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर मनसे आणि ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT