illegal schools list  Saam tv
मुंबई/पुणे

illegal schools list : पालकांनो सावधान! कल्याण-डोंबिवलीत अनधिकृत शाळांचा सुळसुळाट; संपूर्ण यादीच आली समोर

illegal schools list in kalyan dombivli area : कल्याण-डोंबिवलीत अनधिकृत शाळांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. या शाळांची संपूर्ण यादीच आली समोर आली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

List of illegal schools in KDMC Area : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आठ शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या आठमधील सात शाळा या आंबिवली परिसरातील आहेत. तर एक शाळा डोंबिवलीमधील आहे. या शाळेत पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश घेऊ नये, असे आवाहन केडीएमसी प्रशासनाने पालकांना केले आहे

मार्च महिन्यामध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळांची माहिती घेत तपासणी केली. या तपासणीत आठ शाळा अनधिकृत बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले.

महापालिका क्षेत्रातील शासनाच्या परवानगी शिवाय सुरु असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेवू नयेत, असे आवाहन शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांनी केले आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. तसेच संबंधित अनधिकृत शाळांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही केली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांनी दिली.

अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी

एल.बी.एस. इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम

सनराईज स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम.

संकल्प इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम.

पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम.

पोलारिस कॉन्व्हेन्ट स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम.

डी.बी.एस. इंग्लिश स्कुल, आंबिवली (पश्चिम) - इंग्रजी माध्यम

ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल, आंबिवली (पश्चिम) - इंग्रजी माध्यम.

बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कुल, महाराष्ट्र नगर, डोंबिवली (पश्चिम)- इंग्रजी माध्यम.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT