Shruti Kadam
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र राज्यातील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच आदित्य ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा शाखेचे प्रमुख देखील आहेत.
आदित्य ठाकरे यांनी त्यांचे शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून केले.
त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून इतिहासात पदवी प्राप्त केली.
पदवीधर झाल्यानंतर, आदित्य ठाकरे यांनी केसी लॉ कॉलेजमधून एलएलबीचीही पदवी घेतली आहे.
आदित्य ठाकरे यांना फोटोग्राफीची आवड आहे. याशिवाय ते कविताही करतात. त्यांनी अनेक चित्रपटगीतेही लिहिली आहेत.
आदित्य ठाकरे यांना खेळांचीही खूप आवड आहे.आदित्य ठाकरे २०१७ मध्ये मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष झाले होते.