kalyan dombivli  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवलीचा विकास झटपट होणार; खटाखट मिळणार बांधकाम परवानग्या, नेमकी यंत्रणा काय?

kalyan dombivli municipal Corporation : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका क्षेत्रात आता सर्व बांधकाम परवानग्या KD-SWiFt प्रणालीद्वारे पूर्णपणे ऑनलाईन मिळणार आहे.

Vishal Gangurde

कल्याणमध्ये बांधकाम परवानग्या प्रक्रियेत मोठी झेप

कल्याणमध्ये नवी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित

मुख्यालयात नव्या प्रणालीचे लोकार्पण

प्रणाली सुरु करणरी केडीएमसी ठरली पहिली महापालिका

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बांधकाम परवानग्या देण्याच्या प्रक्रियेत मोठी झेप घेत अत्याधुनिक KD-SWiFt ही नवी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित केली आहे. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते आज मुख्यालयात या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. राज्यात ही प्रणाली सुरू करणारी केडीएमसी ही पहिली महापालिका ठरली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स आणि बांधकामस्नेही धोरणाचा हा महत्त्वपूर्ण भाग मानला जात आहे. या नव्या पोर्टलमुळे बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, विकासक तसेच सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळण्याचा वेगवान, पारदर्शक आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे.

नवीन KD-SWiFt प्रणालीद्वारे आतापर्यंत BPMSमध्ये मिळणाऱ्या बांधकाम परवानग्यांसोबतच सर्व प्रकारची ना-हरकत प्रमाणपत्रे (NOCs) एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. अर्जदाराला महापालिकेत प्रत्यक्ष येण्याची गरज राहणार नाही, तर प्रत्येक विभागाने ठराविक कालमर्यादेत निर्णय देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे CC (Commencement Certificate) आणि OC (Occupation Certificate) मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.

अर्ज दाखल केल्यानंतर 28 दिवसांत परवानगी देण्याचे मानक कार्यपद्धती (SOP) लागू या पोर्टलचा उपयोग केवळ विकासकांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही होणार आहे. यामध्ये झाडे तोडण्याची परवानगी,ड्रेनेज जोडणीच्या परवानग्या,कर पावत्या इत्यादी सेवा ऑनलाइन मिळणार आहेत.

लोकार्पणावेळी आयुक्त अभिनव गोयल म्हणाले की, BPMS आणि KD-SWiFt या दोन्ही प्रणाली एकत्रित राबवणारी KDMC ही राज्यातील पहिली महापालिका आहे. येत्या काळात या प्रणालीला रेरा प्राधिकरणाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे बनावट परवानग्या आणि रेरा सर्टिफिकेटसंबंधी होणारी फसवणूक थांबणार आहे.

या कार्यक्रमाला नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष डोईफोडे, नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्यासह एमसीएचआय आणि आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? जाणून घ्या

Bihar Politics : बिहारमध्ये काँग्रेसचं पानिपत; कोणत्या चुका ठरल्या पराभवाचं कारण?

Bihar : आई आणि कुटुंबातील सदस्यांचीही मते मिळाली नाहीत; पराभूत उमेदवाराने फोडलं EVMवर खापर

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

Maharashtra Civic Polls: राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर?निवडणुकांचा मुहूर्त मार्च 2026 नंतर ?

SCROLL FOR NEXT