Beed Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: धक्कदायक! कल्याणमध्ये महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Kalyan Crime News: कल्याणमध्ये एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News:

कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या महिलेचे मंगळसूत्रही हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

कल्याणच्या होम बाबा टेकडीवरील जात असताना एका महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने प्रतिकार केल्याने नराधम महिलेचे मंगळसूत्र घेऊन पसार झाला आहे. टिळकनगर पोलीस स्टेशनच्यआ हद्दीत हा प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीत राहणारी एक महिला कल्याण पूर्वेतील होम टेकडीवर चालली होती. ठिकाणी जात असताना एका तरुणाने महिलेला हटकले. त्यानंतर तरुणाने महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

तरुणाच्या कृत्यानंतर महिलेने आरडोओरड करत जोरदार प्रतिकार केला. या महिलेने त्या नराधमाच्या तावडीतून सुटका केली. याचदरम्यान या तरुणाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं आणि पळून गेला.

ही महिला टेकडी उतरून खाली आली. त्यानंतर तिच्यासोबत घडलेला प्रकार काही तरुणांना सांगितला. त्या तरुणांनी त्या पीडित महिलेला भाजप कार्यकर्ते संतोष चौधरी यांच्याकडे नेलं. त्यानंतर पीडित महिलेला घेऊन तरुणांनी पत्रीपूल नजीक असलेल्या पोलिस चौकीत घेऊन गेले. टिळक नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Vanga : ५०७९ मध्ये खरंच जग संपणार? बाबा वेंगांच्या या भविष्यवाणीने उडवली खळबळ

अमित ठाकरेंसह २५ जणांवर पुण्यात गुन्हा; प्राचार्यांच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई, आरोप काय?

Nikki Tamboli Photos: निक्की तांबोळीचा कातील अंदाज; फोटो पाहून नजर हटणार नाही

पुण्यातील कॉलेजबाहेर गांजाविक्री? मनसैनिकांना घेऊन अमित ठाकरेंनी टाकली दुकानावर धाड|VIDEO

Land vs Flat Investment : जमीन की फ्लॅट? तुमचा पैसा कुठे गुंतवला तर होईल जास्त फायदा? खरेदीपूर्वी जाणून घ्या हा फरक

SCROLL FOR NEXT