KDMC : खड्ड्यात जा म्हणण्या ऐवजी कल्याण डोंबिवलीत जा..! कल्याण-डोंबिवलीकर संतापले
KDMC : खड्ड्यात जा म्हणण्या ऐवजी कल्याण डोंबिवलीत जा..! कल्याण-डोंबिवलीकर संतापले प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

KDMC : खड्ड्यात जा म्हणण्या ऐवजी कल्याण डोंबिवलीत जा..! कल्याण-डोंबिवलीकर संतापले

प्रदीप भणगे

डोंबिवली :  कल्याण डोंबिवलीतील खराब रस्ते, त्यावरील खड्डे यावरून कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivali) आणि 27 गावातील नागरिकांनी व नेटकऱ्यांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. कल्याण, डोंबिवली आणि 27 गावात खड्ड्यांमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. तसेच खराब झालेले रस्ते त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या खड्ड्यांचे राजकारण दरवर्षी केले जाते. निवडणूकी आधी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांसाठी 472 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. या रस्त्यांच्या कामाचा नारळ फोडून आणि बॅनर्जीबाजी करून डोंबिवली भाजपाने शुभारंभ देखील केला, मात्र रस्ते झाले नाहीत.

हे देखील पहा :

2019 मध्ये ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी डोंबिवलीतील खड्ड्यांवरून संताप व्यक्त केला होता. प्रसिद्ध कलाकार प्रशांत दामले यांनी सुद्धा कल्याण-डोंबिवली मधील रस्त्यांबाबत फेसबुक पोस्ट केली होती. तर, शिवसेनेनेसुद्धा एमआयडीसी निवासी विभागात रस्त्याचे बॅनर लावले आहेत. मात्र, आता सामान्य नागरिकांनी प्रशासनाला खड्ड्यांवरून धारेवर धरण्यास सुरवात केली आहे. कोपर पुलावर पडलेल्या खड्यांमुळे हा विषय जास्त चर्चेत आला. त्यानंतर मनसे आमदारांनी केलेली पालिकेची नवी व्याख्या आणि आता अभियंता दिनाच्या निमित्ताने नागरिकांनी पालिकेला ट्रोल केले आहे. 

"खड्ड्यात जा असे बोलण्या ऐवजी कल्याण डोंबिवलीत जा असे म्हणतात", "डोंबिवली मधील रस्ते बनविणारे इंजिनिअर सोडून इतर सर्व इंजिनिअरना शुभेच्छा" असे संदेश नेटकऱ्यांनी व्हायरल केले आहेत. खड्ड्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की महत्वाच्या रस्त्यांवरील खड्डे खडी भरून बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सूरु आहे. पावसाची उघडीप मिळताच डांबरीकरण करून हे खड्डे बुजविले जातील असे त्यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Care Tips: उन्हाळ्यात बाईकची काळजी कशी घ्याल? या भन्नाट ट्रिक्स फॉलो करा

Weightloss Tips: मासिक पाळीनंतर खा हे पदार्थ , वजन होईल कमी

Shubman Gill Statement: गुजरातचं नेमकं चुकतय तरी कुठं? कर्णधार शुभमन गिलने सांगितली पराभवाची कारणं

Mahadev Betting App Case : २००० सीम कार्ड, १७०० बँक खाते, ३२ आरोपी आणि १५००० कोटींचा स्कॅम; काय आहे महादेव बेटिंग अॅप घोटाळा?

Why Aamir Khan Called Mr. Perfectionist : आमिर खानला ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कसा मिळाला?; शबाना आझमीचं नाव सांगत म्हणाला...

SCROLL FOR NEXT