Kalyan News update  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

Kalyan News update : कल्याण डोंबिवली शहर रात्री देखील प्रकाशमय होणार आहे. यासाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय घेतलाय.

Vishal Gangurde

केडीएमसीने सौर ऊर्जा वापरात ऐतिहासिक पाऊल टाकत पहिला सोलर हायमास्ट बसवला

हायमास्ट फिलिप्स कंपनीने मोफत दिलाय, त्याची किंमत सुमारे 7.5 लाख रुपय

दिव्यामुळे वीज बचत होणार, तांत्रिक बिघाडाच्या काळात रस्त्यांवर प्रकाश राहणार

नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करत घेतला निर्णय

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सोलर क्षेत्रात महत्वाच पाऊल टाकलंय. पालिकेच्या विद्युत विभागाच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवलीतील पहिल्या अत्याधुनिक सोलर हायमास्टचे लोकार्पण करण्यात आलं. कल्याण पश्चिमेच्या गणपती चौकात हे लोकार्पण करण्यात आलं.

पालिकेच्या विद्युत विभागाच्या पाठपुराव्याने 7.5 लाख किमतीची ही हायमास्ट फिटिंग फिलिप्स कंपनीकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आलीये. फिलिप्स इंडियाकडून सोलर हायमास्ट प्रायोगिक तत्त्वावर केडीएमसीला उपलब्ध करून देण्यात आलाय.

वीज पुरवठा खंडित किंवा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर शहर अंधारात बुडून जातं. त्यावेळी रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होता. अंधाराचा गैरफायदा घेऊन काही गैरकृत्य झाल्याच्या घटना अनेकदा समोर आल्यात. मात्र, सोलर हायमास्टमुळे या गैरकृत्यांना आळा बसणार आहे. तसेच शहर अंधारमय होणार नाही, असा विश्वास यावेळी विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त अभियंता प्रशांत भागवत यांनी व्यक्त केलाय.

नेहमीच्या सोलर हायमास्टपेक्षा या दिव्यांचा उजेडही अधिक जास्त आहे. इतकेच बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर दोन दिवस हे दिवे सुरू राहू शकतील, अशी माहिती दिली. या हाय मास्टचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये बसवण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांची सुरक्षिततेसोबतच वीज बचतही होऊ शकणार आहे. लोकार्पणावेळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उपकार्यकारी अभियंता भागवत पाटील आणि फिलिप्स इंडियाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सोलर हायमास्टचा उद्देश काय?

नागरिकांची सुरक्षा, वीज बचत आणि तांत्रिक बिघाड झाल्यासही रस्त्यांवर उजेड राहणे, हा मुख्य उद्देश महापालिकेचा आहे.

पहिला सोलर हायमास्ट कुठे बसवण्यात आलाय?

कल्याण पश्चिमेतील गणपती चौकात हा सोलर हायमास्ट बसवण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT