मुंबई/पुणे

कुत्र्याच्या हल्ल्यात 150 जण जखमी ; कुत्र्याच्या शोधासाठी पोलीस मैदानात

Kalyan Dog Attack: कल्याणमध्ये एका कुत्र्याच्या हल्ल्यात 150 जण जखमी झालेत..त्यामुळे कुत्र्याच्या शोधासाठी पोलिस कसे मैदानात उतरलेत. पाहूयात या रिपोर्टमधून

Snehil Shivaji

कल्याणमध्ये पोलिसांची सध्या भलतीच तारांबळ उडालीय. हातात लाठ्या-काठ्या घेतलेले पोलीस रात्रीच्या अंधारात गल्लोगल्ली कोणाचा शोध घेतायत माहितीये? ज्याने कल्याणमध्ये दहशत माजवत तब्बल १५० लोकांवर हल्ले केलेत... सध्या पोलिस, राजकीय कार्यकर्ते आणि पालिका ज्याचा शोध घेते तो कुणी अट्टल गुन्हेगार किंवा गँगस्टर नाही, तर तो आहे.

होय... अगदी बरोबर ऐकलंत तुम्ही. कल्याणचे पोलीस आणि पालिका सध्या एका भटक्या कुत्र्याच्या मागावर आहेत! पोलिसांच्या २ गाड्या, ५-६ पोलीस कर्मचारी आणि सोबतीला कल्याण-डोंबिवली पालिकेचं श्वान नियंत्रण पथक. हातात दोऱ्या, जाळ्या आणि गोण्या घेऊन ही संपूर्ण फौज एका पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद करण्यासाठी रात्रीच्या अंधारात सर्च ऑपरेशन करतेय. या पिसाळलेल्या कुत्र्याने कल्याणमध्ये कशी दहशत निर्माण केलीये. ऐका

यामध्ये फ्लॅश बाईट लावा एकामकोमाग एक धडाधड गेले पाहिजे. एकाच भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला करत नागरिकांचे अक्षरश लचके तोडलेत. सध्या अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून एका चिमुरडीची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं आणि प्रशासनाविरोधात संतापाचं वातावरण आहे. 150 नागरिक कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर झोपलेलं प्रशासन खडबडून जागं झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT