Kalyan Dengue death saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याणमध्ये डेंग्यूचा पहिला बळी, ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; KDMC मध्ये २ महिन्यांत ३५ रुग्णांची नोंद

kalyan dengue first death 35 cases kdmc : कल्याण - डोंबिवलीत डेंग्यू या आजारानं हातपाय पसरले असून मागील दोन महिन्यांत ३५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर डेंग्यूनं एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे.

Nandkumar Joshi

अभिजीत देशमुख, साम टीव्ही | कल्याण

कल्याणमध्ये डेंग्यूनं पहिला बळी घेतला आहे. विलास म्हात्रे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच म्हात्रे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीकरांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कल्याण-डोंबिवलीमध्ये ताप, सर्दी आणि खोकला यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. त्यात डेंग्यू आजारानंही डोकं वर काढलं आहे. गेल्या दोन महिन्यांत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत डेंग्यूचे ३५ रुग्ण आढळले आहेत. तर रुग्णालयात उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कल्याणमध्ये डेंग्यूचा पहिला बळी

विलास म्हात्रे असे मृत व्यक्तीचे नाव

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूच्या ३५ रुग्णांची नोंद

पावसाळ्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. मलेरिया, डेंग्यू या आजारांनी कल्याण-डोंबिवलीत डोकं वर काढलंय. मेपासून आतापर्यंत डेंग्यूचे 30 हून अधिक रुग्ण कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेत. कल्याण पश्चिम बेतूरकर पाडा येथे राहणाऱ्या विलास म्हात्रे या ३१ वर्षीय तरुणाला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले होते.

सात जुलै रोजी विलासला कल्याणमधील केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात नेण्याच्या सूचना केडीएमसी रुग्णालयाकडून करण्यात आला होत्या. मात्र विलास याच्या कुटुंबीयांनी त्याला कल्याण पूर्वेकडील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने आज विलास म्हात्रे याचा मृत्यू झाला. याबाबत केडीएमसीच्या आरोग्य विभागाने देखील दुजोरा दिलाय.

याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सांगितले की, विलास याला डेंग्यूचे निदान झाल्याचे समजताच विलास राहत असलेल्या परिसरात सर्वेक्षण करत धूर फवारणीसह आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यात आढळतो.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

नागरिकांनी सात दिवसांतून एकदा साठवलेले पाणी ओतून भांडी स्वच्छ करावी. 25 मे पासून दीड लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तीनशे ठिकाणी डासांच्या अळ्या सापडल्या. तेथे औषध फवारणी करण्यात आली आहे. डेंग्यूसंदर्भात संबंधित परिसरात जनजागृती तसेच आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डेव्हलपर्स आणि सोसायटी यांना देखील नोटिसा देण्यात आल्या आहेत. सोसायटीच्या सोशल मीडिया ग्रुपवरही डेंग्यू, मलेरिया संदर्भात जनजागृती व घ्यावयाची काळजी यासंदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. नागरिकांनी डेंग्यू किंवा मलेरियासदृश्य लक्षणं आढळल्यास तात्काळ केडीएमसीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन देखील यावेळी अतिरिक्त आयुक्त गायकवाड यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Live Update: नांदगावला धुवाधार पाऊस लेंडी नदीला पुर .रेल्वे अंडरपास 3 फूट पाण्याखाली

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT