Kalyan News  Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Crime News : महिला कॉन्स्टेबलवर गुंगीचे औषध देत अत्याचार, कल्याणमधील धक्कादायक घटना

Kalyan Crime News : आरोपी आणि पीडित महिला कॉन्स्टेबलची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक महिला कॉन्स्टेबलला गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पीडितेबरोबर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर जातीचे कारण देत आरोपीने लग्न करण्यास नकार दिला.

या प्रकरणी पीडितेने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी आकाश घुले याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे (Crime News)

कल्याणमध्ये राहणारी पीडित महिला मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची इंस्टाग्रामवर आकाश घुले या तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. भेटण्याच्या बहाण्याने आकाश तिच्या राहत्या घरी गेला.  (Latest Marathi News)

गुंगीचे औषध असलेले पेय तिला प्यायला दिले. त्यानंतर त्याने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर लग्नाच्या आमिष दाखवून त्याने पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता आकाशने जातीचे कारण देत लग्न करण्यास नकार दिला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने या प्रकरनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी आकाश घुले विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २ दिवसात हे काम कराच अन्यथा पीएम किसानचे ₹२००० बंद होणार

Maharashtra News Live Update: आज पुणे स्टेशनवरून एकही लोकल सुटणार नाही

३२ वर्षीय बायकोचे शिक्षकासोबत अफेअर; ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, नागपुरातील धक्कादायक घटना

Gayatri Datar Mangalsutra Design: शिव-शक्तीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं! गायत्री दातारच्या 'दोन वाट्यांच्या' मंगळसूत्राने वेधलं लक्ष

PM Modi Plays Football: प्रचार थांबताच पंतप्रधान मोदी सिक्कीममध्ये, मुलांसोबत खेळले फुटबॉल, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT