Crime New Saam TV
मुंबई/पुणे

kalyan Crime : मित्रानेच केला मित्राचा घात, पैशांसाठी तोतया पोलीस बोलावून उकळले लाख रुपये

kalyan crime News update : पैशासाठी मित्रानेच मित्राला लुटल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. तोतया पोलिसांना बोलवून मित्राला लुटल्याचा प्रकार समोर आलाय. मानपाडा पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या

Namdeo Kumbhar

अभिजित देशमुख, साम प्रतिनिधी

Kalyan Crime News Update : मित्राकडे पैसे असल्याचे पाहून एका तरुणाची नियत फिरली. त्याने मित्राला लुटण्याचा प्लान आखला .आपल्या सहकाऱ्यांना पोलीस बनवून त्याच्या कार्यालयात पाठवले व या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याच्याकडून तब्बल एक लाख रुपये उकळले . सीसीटीव्ही फुटेजमुळे या कृत्याचा भांडाफोड झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू करत या प्रकरणी वीरेंद्र गुप्ता या मास्टरमाइंडला त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्यात. वकील अहमद खान,शिवानंद पांडे अशी उर्वरित दोघांचे नावे आहेत त्यांचा एक साथीदार पसार असून मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

शुभम गुप्ता हा तरुण कल्याण पूर्वेकडील पिसवली परिसरात राहतो. शुभम व वीरेंद्र गुप्ता यांची मैत्री आहे. शुभमकडे पैसे असल्याची माहिती वीरेंद्रला होती, हे पैसे काढण्यासाठी त्याने आपल्या मित्रालाच फसवण्यासाठी प्लॅन आखला. आपल्या तीन सहकाऱ्यांना शुभमच्या कार्यालयात पोलीस बनून जाण्यासाठी सांगितले.

ठरल्याप्रमाणे त्याचे चार साथीदार हे शुभम याच्या कार्यालयात गेले. शुभमला जबरदस्तीने ऑफिसच्या बाहेर घेऊन गाडीत बसवले कोणी जवळ जाऊन त्याच्याकडून पाच लाख रुपयांची मागणी केली. शुभमकडून एक लाख रुपये घेऊन तोतया पोलीस पसार झाले. दरम्यान शुभमच्या कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणाचा भांडाफोड झाला. शुभम याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.

एका दिवसात पोलिसांनी या प्रकरणातील भांडाफोड करत वीरेंद्र गुप्ता याला ताब्यात घेतलं. त्याने केलेला गुन्हा कबूल केला .पोलिसांनी त्याचे दोन साथीदार वकील अहमद खान शिवानंद पांडे या दोघांना भेटा ढोकला त्यांचा एक साथीदार पसरून मानपाडा पोलीस त्याचा शोध आहेत. याप्रकरणामुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT