Kalyan Khadakpada Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: कल्याणमध्ये दोन गटात तुफान राडा; तलवार, पिस्तूल काढत आपसात भिडले

Kalyan News: कल्याणमध्ये दोन गटात तुफान राडा; तलवार, पिस्तूल काढत आपसात भिडले

Satish Kengar

Kalyan Crime News:

कल्याण जवळील वडवली गावात बांधकाम साईटवर मातीच्या भरणीच्या वादातून दोन गटात राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी दोन्ही गटाचे लोकांनी तलवारी आणि बंदूक काढत आपसात भिडले आहेत. या राड्यात तीन ते चार जण जखमी झालेत.

या प्रकरणी खडकपाडा पोलीसानी मारहाण करणाऱ्या शिवसेना माजी नगरसेवकासह दोन्ही गटातील सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी शिवसेना माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील वडवली येथे तलावाजवळ एका जागेवर भरणीचे काम सुरू होते. याचदरम्यान गावामधील दोन गटात जमिनीवर सुरू असलेल्या भरणीच्या कामाच्या वादातून हाणामारी झाली. या वादात दोन्ही गटाने एकमेकांना धाक दाखवण्यासाठी धारदार शस्त्र, तलवार व बंदुकी बाहेर काढल्या. (Latest Marathi News)

यातच शिवसेनेचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी पिस्टल दाखवत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हाणामारी तीन ते चार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून खडकपाडा पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, वैभव पाटील पंकज पाटील मनोहर पाटील राहुल पाटील कमलाकर पाटील विरोधात गुन्हे दाखल केलेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

SCROLL FOR NEXT