Kalyan Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: धक्कादायक! पैसे देण्यास नकार दिल्याने हॉटेलच्या कॅशिअरला बेदम मारहाण; दोन जणांना अटक

Kalyan Latest News: संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, प्रतिनिधी

Kalyan Crime News:

पैसे दिले नाही म्हणून हॉटेलच्या कॅशियरला मारहाण करत त्याच्याकडून १३ हजार रुपये हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण पश्चिमेतील बिर्ला रोड (Kalyan Crime) परिसरात डिवाईन फाईन वाईन रेस्टारंट आणि बार हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये सूरजकुमार चौपाल हा २४ वर्षीय तरुण कॅशियरचे काम करतो. मंगळवारी संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास दत्ता जाधव त्याचा भाऊ सिद्धेश जाधव आणि एक तरुण आला.

त्यांनी जोर जोरात ओरडून हॉटेलचे मालक कुठे आहे. त्याला इकडे बोलावा असे बोलू लागले. तसेच तिघांनी कॅशियरकडे पैशांची मागणी केली. मात्र कॅशियरने पैसे देण्यास नकार दिला. संतापलेल्या या तिघांनी कॅशियरला मारहाण केली त्याच्या खिशातील पैसे हिसकावून घेतले, त्यानंतर हॉटेलची तोडफोड करून तिथून ते पसार झाले.

या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलिस निरिक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. या प्रकरणी सिद्धेश जाधव सह अन्य एकाला अटक केली आहे. तसेच पोलीस आणखी एका आरोपीचा सध्या शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; 5 आरोपींना मुंबई गुन्हे शाखा उद्या कोर्टात हजर करणार

Thursday Horoscope: धनलाभाचे योग अन् नात्यांत गोडवा; या ४ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले? जरांगे आरोपांचे पुरावे देणार?

शूटर १५ तासांत जेरबंद पण मास्टरमाइंड कोण? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT