Kalyan Father Try To Murder Daughter Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : बाप की हैवान? कौटुंबिक वादातून अडीच वर्षाच्या मुलीचा चिरला गळा; कल्याणमधील संतापजनक घटना

Kalyan Crime News : कल्याणमध्ये एका बापाने आपल्या अडीच वर्षांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आईच्या सतर्कतेमुळे मुलीचा जीव वाचला असून ती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

Alisha Khedekar

  • कल्याणमध्ये बापाकडून मुलीवर जीवघेणा हल्ला

  • आईच्या सतर्कतेने चिमुकलीचा जीव वाचला

  • मुलगी गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

  • आरोपी वडिलांचा पोलिसांकडून शोध सुरू

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Kalyan Father Try To Murder Daughter जगातील सुंदर नेत्यांपैकी एक म्हणजे वडील आणि मुलीचं नातं. मात्र याचं नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या बापाने आपल्या अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने पीडित मुलीच्या आईच्या सतर्कतेने तिचा जीव वाचला आहे. सध्या ती गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी महिलेने तिच्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली असून दोघींच्या जीवाला धोका असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी दिनकर आणि तिचा पती विलास दिनकर हे कल्याण पूर्वेतील खडेगोळी परिसरातील रहिवाशी आहेत. या दोघांना अडीच वर्षांची मुलगी आहे. लक्ष्मी आणि विलासमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. पतीकडून वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून लक्ष्मी ही मध्यप्रदेशातील आपल्या माहेरी निघून गेली होती. तिच्या पाठोपाठ मध्यप्रदेशात जाऊन विलासने त्याच्या मुलीला घेऊन कल्याण गाठले.

गेले २० दिवस विलास आपल्या मुलीला घेऊन बेपत्ता होता. यानंतर लक्ष्मीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देत पतीकडून तिला आणि मुलीला जीवितास धोका असल्याचे सांगितले होते. दरम्यान गुरुवारी सकाळी विलासने चिमुकली अदितीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र आई लक्ष्मीची नजर पडताच तिने धाव घेत मुलीला वाचवले. जखमी अवस्थेत मुलीला घेऊन लक्ष्मी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये गेली. मात्र गंभीर जखमा असतानाही डॉक्टरांनी केवळ क्रीम लावून तिला घरी पाठवल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

मुलीची प्रकृती खालावत असल्याने लक्ष्मीने तिला दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र जास्त खर्च सांगितल्याने अखेर, लक्ष्मीने मुलीला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. सध्या येथे चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस आरोपी विलास दिनकर याच्या शोधात आहेत. तसेच उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणावरही कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेनंतर मुलगी वडिलांच्या कुशीतही सुरक्षित नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Amravati Crime : दफन केलेला तरुणाचा मृतदेह २३ दिवसांनी पुन्हा थडग्याबाहेर काढला; धक्कादायक आलं समोर?

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT