बदलापूर काटइ रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना सापळा रचत कल्याण क्राईम ब्रँचने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सात लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा देखील जप्त केला. कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाचा तपास सुरू असताना हा गुटखा मलंग रोडवर असलेल्या कुशवली गावात एका कारखान्यात बनवला जात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या कारखान्यावर देखील छापा टाकला. या ठिकाणी एक शेड खाली सुरू असलेल्या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन, गुटख्याचा साठा कच्चामाल असा तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय.
कल्याण क्राईम ब्रँचने याप्रकरणी विराज आलेमकर यांच्यासह कारागीर मोहम्मद रहमान व मोहम्मद खान या दोघांना बेड्या ठोकल्यात. विराज हा या आधी देखील गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. या गुटख्यासाठी लागणारा कच्चामाल हा सुरतवरून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारखान्यासाठी जागा दिली त्या जमीन मालकाचा शोध सुरू असून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळाल्या माहितीनुसार, बदलापूर काटई रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचचे अधिकारी संतोष उगलमुगले यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँच पथकाने बदलापूर काटई रोडवर सापळा रचला. एक गाडी संशयास्पद रित्या येताना दिसली असता पोलिसांनी ही गाडी थांबून त्याची झडती घेतली. या गाडीमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी या गाडीतील तीन आरोपींना ताब्यात घेतलं. विराज आलिमक, मोहम्मद रहमान, मोहम्मद खान, अशी या तीन आरोपींची नावे आहेत. (Latest Marathi News)
हे तिघे मुंब्रा येथे राहणारे आहेत. अप्पर पोलीस आयुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार पोलीस निरीक्षक राहुल मस्के, संदीप चव्हाण, संतोष उगलमुले, पोलीस कर्मचारी राहुल कामत, गोरक्ष शेकडे, गुरुनाथ जरग यांच्या पथकाने या प्रकरणी तपास सुरू केला. अटक तिघा आरोपींकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरात कुशवली गावात जंगला शेजारी गुटखा बनवण्याचा कारखाना सुरू होता. कल्याण क्राईम ब्रांच चा पथकाने तात्काळ कुशवली गावाजवळ धाव घेत या कारखान्यावर छापा टाकला . एका शेड खाली सुरू असलेल्या या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन व गुटख्याचा साठा देखील होता.
पोलिसांनी गुटखा बनवण्याची मशीन, गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल, गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी गाडी व गुटख्याचा साठा असा तब्बल 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. 'राज निवास' या ब्रँडने गुटखा बनवून तो बाजारात विकला जात होता. विराज आलिमकर या आरोपी ने हा कारखाना सुरू केला होता. तर मोहम्मद रहमान व मोहम्मद खान हे दोघं कारागीर गुटखा बनवण्याचे काम करत होते.
विराज या आधी देखील गुटखा विक्रीच्या व्यवसायात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा कारखाना कधीपासून सुरू होता, त्यांनी आत्तापर्यंत किती गुटख्याच्या साठ्याची विक्री केली आहे? या कारखान्याचा जमीन मालक कोण आहे? याचा तपास कल्याण क्राईम ब्रँच करत आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल हा सुरतवरून येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे गुटखा प्रकरणात सुरत करेक्शन असल्याचे देखील शक्यता वर्तवण्यात येतेय कल्याण क्राईम ब्रँच पथक याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.