Kalyan Air Hostess Suicide Harassment Case Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime : लग्नाचं वचन देऊन लाखो रुपये उकळले, शरीर संबंध ठेवत मारहाण केली; नैराश्येत गेलेल्या एअर होस्टेसने जीवन संपवलं

Kalyan Crime News : कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीने प्रेमसंबंधातील छळ, मारहाण आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल असूनही अटक नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

Alisha Khedekar

  • कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली

  • ६ वर्षांच्या प्रेमसंबंधातून छळ आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप

  • बँक स्टेटमेंट आणि मोबाईल मेसेजमधून आर्थिक पिळवणुक उघड

  • गुन्हा दाखल होऊन देखील आरोपी मोकाट

Kalyan Air Hostess Suicide Harassment Case : कल्याणमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका २१ वर्षीय एअर होस्टेस असलेल्या तरूणीने प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव नेहा पावशे असं आहे. हा प्रकार प्रेम संबंधातील छळामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कौशिक पावशे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून तो अद्यापही मोकाट फिरत असल्याचा दावा तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कौशिक पावशे आणि मृत तरुणीचे गेल्या ६ वर्षांपासून प्रेम संबंध होते. लग्नाचं वचन देत कौशिकने नेहासोबत शारीरिक संबंध ठेवले, तिला मारहाण केली, इतकेच नव्हे तर फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून लाखो रुपये त्याने घेतले, असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

मृत तरुणीची हैदराबादला बदली झाली होती. आरोपीने तिथे जाऊन सुद्धा तरुणीला मारहाण केल्याचे समोर आले आहे. १६ आणि २४ डिसेंबर दरम्यान तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसत होते. मृत्यूपूर्वीही तिच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याचे बँक स्टेटमेंटमध्ये दिसून आल्याचे तरुणीच्या कुटुंबीयांचे मत आहे. तसेच तरुणीचा मोबाईल तपासल्यानंतर काही मेसेजमध्ये कौशिकने त्रास दिल्याचे निष्पन्न झाले आहे

दरम्यान कौशिकच्या त्रासाला कंटाळून हताश झालेल्या तरुणीने गळफास घेत आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. याप्रकरणी मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही पोलीस आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कौशिक प्रकाश पावशे असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे आता गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरत असल्याने संतप्त कुटुंबीय आणि महिलांनी थेट पोलीस ठाण्यावर घेराव घालत मोठा गोंधळ घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: हाय BP कंट्रोलमध्ये ठेवायचंय? मग सकाळीच 'हा' ज्यूस प्या, काहीच दिवसांत मिळेल आराम

ZP Election Date : पुणे-सोलापूरसह १२ झेडपीचा आज धुरळा उडणार, दुपारनंतर राज्यात आचारसंहिता

Bigg Boss Marathi 6 : भांड्यांचा ढिगारा पाहून स्पर्धक चक्रावले; टास्कदरम्यान 'ही' सदस्य बेशुद्ध पडली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पालिकाबाहेर राडा

IndBank Recruitment 2026: परीक्षा नाही थेट सरकारी बँकेत नोकरी; विविध पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT