Kalyan Building Collapsed: Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Building Collapsed: 'सप्तश्रृंगी' इमारत दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई, घरमालकाला बेड्या

Kalyan Building Collapsed: कल्याणमध्ये मंगळवारी चिकणीपाडा येथे सप्तश्रृंगी इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले. या घटनेप्रकरणी घरमालकाला अटक करण्यात आली आहे.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याण पूर्वेकडील चिकणीपाडा परिसरातील सप्तशृंगी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने घडलेल्या इमारत दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला तर ६ जण जखमी झालेत . या दुर्घटनेदरम्यान इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कृष्णा चौरसिया या घरमालकाचे फ्लोरिंगचे काम सुरू होते. याचदरम्यान ही दुर्घटना घडली. कोळशेवाडी पोलिसांनी घरमालक कृष्णा चौरस याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या.

कल्याण पूर्वेकडील चिकणीपाडा परिसरातील सप्तशृंगी या पाच मजली इमारतीच्या चौथा मजल्यावरील स्लॅब पत्त्याप्रमाणे कोसळला. या दुर्घटनेत ६ जण जखमी झाले तर ६ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे कल्याण- डोंबिवली शहरातील धोकादायक अति धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे . या दुर्घटनेनंतर केडीएमसीने या सप्तशृंगी इमारतीसह आजूबाजूच्या चाळी रिकाम्या केल्या आहेत. या इमारत आणि चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे कल्याण पूर्व येथील शाळांमध्ये तात्पुरतं पुनर्वसन केलं आहे.

दोन दिवसांपूर्वी या इमारतीत चौथा मजल्यावर राहणारे कृष्णा चौरसिया यांच्या घरी फ्लोरिंगचं काम सुरू करण्यात आलं होतं. त्यांनी इमारतीमध्ये राहणाऱ्या कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. या कामादरम्यानच हा स्लॅब कोसळला. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात कृष्णा चौरसिया यांच्याविरोधात निष्काळजीपणा आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घरमालक कृष्णा चौरसियाला अटक करण्यात आली आहे. आज सकाळच्या सुमारास फॉरेन्सिक लॅबचे पथक या इमारतीमध्ये दाखल झाले. या इमारतीमधील विटा टाइल्स मातीचे सॅम्पल घेण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या इमारत दुर्घटनेचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime News : अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध, गर्भवती असल्याचं कळताच बालविवाह; रायगडमध्ये खळबळ

Karnataka Tourism: पार्टनरसोबत फिरायला जायचंय, मग कर्नाटकमधील 'या' ठिकाणी नक्की जा

VIDEO : 'तुला ऐकायला येत नाही का?' माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उर्मटपणा, डोक्यावर तुळस असलेल्या महिलेला ढकललं

Maharashtra Politics: दोघही फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत, मराठी माणसाचा काय फायदा; उद्धव ठाकरेंनंतर राणेंचा राज ठाकरेंवरही हल्लाबोल

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

SCROLL FOR NEXT